क्राईमधुळे

धुळ्यात ८० हजारांची सुपारी फुटताच आले ‘हाशु’ धंदेवाईक दलाल हलालने केली शिष्टाई….!

खान्देश वार्ता-(धुळे)
पार्सल सेवेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूचा मोठा साठा दाखल झाल्याचा वास लागताच जिल्हा पोलिस दलाच्या सोनगीर पोलिस ठाण्यातील दोन जण सक्रिय झाले. मात्र माल सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच शहरातील सुपारी शेठ अडकित्त्यात अडकल्याने मोठी पंचाईत झाली.

सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र होते. मात्र, अचानक निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे पंचाईत झाली. संबंधितांकडून माल सोडवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले. काही काळासाठी वातावरण चांगलेच तापल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, शहरातील धंदेवाईक व्यवहारात मध्यस्थी करण्यात मोठा हातखंडा असलेला ‘हलाल’ दलाल पुढे सरसावला. त्याने दोन्ही बाजूंशी संपर्क साधत शिष्टाई सुरू केली. पडद्यामागील बैठका, फोनाफोनी आणि समझोत्याच्या हालचालींनंतर अखेर मार्ग निघाल्याचे बोलले जात आहे.

या मध्यस्थीनंतर धुळे तालुक्यातील सोनगीरच्या त्या दोघांची ८० हजारात सुपारी फुटली आणि तणाव निवळला. यानंतर खात्यातील दोघांनाही मग चांगले ‘हासु’ आले. जुने आणि नवे एसपी येण्याजाण्याच्या कालावधीत या दोघांना त्या दोघांनी सलामी दिली.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six + eleven =

Back to top button