क्राईमधुळे

शिंदखेडा तालुक्यातील लाचखोर ग्रामसेविका एसीबीच्या ताब्यात

खान्देश वार्ता-(धुळे)
जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चौगांव ग्रामपंचायत येथील ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदार यांचेकडुन १५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली असता लाचेची रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

यातील तक्रारदार यांनी ग्रामपंचायत चौगांव बु. येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम घेवुन ते काम पुर्ण केले असुन सदर कामावर झालेल्या खर्चाचे बिल तक्रारदार यांना अदा करण्यात आले होते. तसेच तक्रारदार यांनी मौजे चौगांव बु. येथे रस्ता सिमेंट कॉकीटीकरणाचे काम केले असुन त्या कामाकरीता झालेल्या खर्चाचे बिल त्यांना अदा करण्यात आलेले नव्हते म्हणुन तकारदार यांनी एक महिन्यापुर्वी ग्रामसेविका राजबाई पाटील यांची भेट घेवुन त्यांनी केलेल्या रस्ता सिमेंट कॉकीटीकरणाच्या कामावर झालेल्या खर्चाचे बिल अदा करण्याची विनंती केली.

IMG 20240415 WA0038

ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे रस्ता कॉकीटीकरणावर झालेल्या खर्चाचे बिल काढण्याकरीता तसेच तक्रारदार यांनी यापुर्वी केलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचे बिल काढून दिल्याचे मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

या तक्रारीच्या पडताळणी अंती ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती पंधरा हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. त्या अनुषंगाने सोमवार (दि.१५) रोजी सापळा कारवाई दरम्यान तकारदार यांचेकडुन पंधरा हजार रुपये लाचेची रक्कम त्यांचे शिंदखेडा येथील राहते घरी स्वतः स्विकारतांना ग्रामसेविका राजबाई पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द शिंदखेडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर, दिपाली सोनवणे या पथकाने केली आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 − 10 =

Back to top button