अन्य घडामोडीधुळे

धुळे जिल्हा परिषदेत भास्कर वाघ अपहार कांड नंतर नवीन वाघाचा धुमाकूळ..!

खान्देश वार्ता-(धुळे)
जिल्हा परिषद ही भास्कर वाघच्या अपहार कांड, एनआरचएचमचे अपहार कांड, अपंग युनिट अंतर्गत बोगस भरती प्रक्रीया, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या भ्रष्टाचारामुळे कुख्यात झालेली आहे. आता भास्कर वाघची सुधारीत आवृत्ती म्हणे नवीन एक वाघला पोसण्यात जिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा धन्यता मानत आहे. एकाच विभागात एकाच टेबलवर मलईदार कामे पाहत मलीदा खाणारा आणि अधिकाऱ्यांना देखील पोसणाऱ्या हा वाघ या कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यांची विशेष मेहरजर का असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे.

तसा प्रश्न आम्हाला देखील पडल्याने हा पत्र प्रपंच आहे. वाघ जणु जिल्हा परिषद प्रशासनाचा जावई आहे अशी बडदाश्त त्याची ठेवण्यात येते. मागील १२ वर्षात या महाभागाचा टेबल ही कोणी बदलु शकलेले नाही एवढी खास आसामीवर आपली देखील विशेष मेहर नजर आहे हे विशेष.

जिल्हा परिषद आणि भ्रष्टाचार हे समिकरण जणु पक्के आहे.त्यात आता वाघची भर पडलेली आहे. वाघ तसा तांत्रीक कर्मचारी आहे. जोडारी ही त्याची मुळ आस्थापना आहे. मात्र त्या कर्मचाऱ्याकडे काही वर्षापुर्वी लिपीक पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.भ्रष्टाचाराला थारा लागु नये म्हणुन शासनाने प्रत्येक तीन ते पाच वर्षात टेबल आणि विभाग बदल करण्याचे धोरण आहे. मात्र प्रशासनाचा खास जावई असलेला वाघ तब्बल १२ ते १४ वर्षा पासुन बांधकाम विभागात एकाच टेबलवर ठाण मांडून आहे.

दरवर्षी या वाघवर च्या बदली बाबत कर्मचारी संघटना मागणी करतात. मात्र कोणताच अधिकारी या वाघची बदली करण्याचे धाडस करत नाही. त्याचे कारण देखील तसेच आहे. हा वाघ याच्याकडे मलईदार टेबल असल्यामुळे वर्ग एक अधिकाऱ्या पेक्षा देखील जास्त माया या वाघने जमवलेली आहे. त्यामुळे कोणत्याही अधिकारी सहज विकत घेऊ शकणारा वाघ बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या गळ्यातील ताईत होतो. सर्व बड्या अधिकाऱ्यांना पाकीट पोहचविणारा वाघची म्हणुनच बदली केली जात नाही.

साधा जोडारी असलेल्या हा फाॅरवर्ड लिपीक एकाच टेबलावर काम करत आज कोट्यावधी रुपयांचा धनी झालेला आहे. सेस फंडाचा टेबल या वाघकडे जुने भंगार साहित्य विक्रीची जबाबदारी वाघ कडे, काम वाटपाचा टेबल वाघ कडे अशा सर्व प्रमुख मलईदार कामे वाघ कडे असल्याने हा वाघ सध्या वाहनांच्या ठेक्यात पार्टनर, जिल्हा परिषद कॅन्टीन मध्ये पार्टनर, जिल्हा परिषदेत देखभाल दुरुस्तीच्या प्रत्येक काम कुणाल नेरकर या कंत्राटदाराला देवुन त्यात हा वाघ देखील पार्टनर होतो.

मोठ्या प्रमाणात माया जमविणाऱ्या वाघ विरुध्द कोणताच पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी बोलु शकत नाही. कारण प्रत्येकाला पाकीट पोहचवित त्यांचे तोंड दाबण्यात माहिर असलेल्या वाघने चक्क सामाजीक संघटना, पत्रकारांना देखील विकत घेतल्याचे बोलले जात आहे.

वाघ हा जिल्हा परिषद मधील सध्या सर्वाधिक कमाई करणारा कर्मचारी आहे. या विभागात कोणी माहिती अधिकारी टाकला किंवा साधी तक्रार जरी केली. तरी त्यांना मॅनेज करण्यासाठी वाघ पुढे असतो. जिल्हा परिषदेत दररोज नविन बांधकाम,दुरुस्ती,फर्निचर दुरुस्तीची कामे करुन लाखो रुपये घश्यात घालणारा हा कलाकार कर्मचाऱ्याचा साहेबी थाट पहाण्या सारखा असाच आहे.

प्रत्येक आठ दिवसात त्याच्या आलीशान कारवरील एंट्री त्याच्या भ्रष्टाचाराची ओळख करुन देतो.कधी क्रेटा,कधी स्कोडा,कधी ब्रेझा तर कधी स्विफ्ट अशा आलीशान कार घेऊन वाघ जिल्हा परिषदेत दाखल होतो. त्याच्या सम्यक नाव असलेली वाहने जिल्हा परिषदेत पार्क केलेली असतात.

एका ना अनेक लफड्यातील प्रत्यक्ष भागीदार असलेल्या वाघ याच्यावर असलेले आपल्या प्रशासनाचे प्रेम कमी करत या वर्षी होणाऱ्या प्रशासकीय बदलीत वाघच्या पार्श्वभागावर लाथ घालण्याचे धाडस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दाखवून वाघची तातडीने मुख्यालयाच्या बाहेर बदली करण्यात यावी. तसेच या वाघ कडे असलेल्या टेबलवरील प्रत्येक कामाचे मागील दहा वर्षातील कामांचे सोशल ऑडीट करण्यात यावे.या ऑडीट मध्ये  वाघने मागील दहा वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराचा मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे मात्र निश्चित आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 1 =

Back to top button