नंदुरबारमनोरंजन

सारंखेडा चेतक फेस्टिवलमध्ये अश्वांचे नृत्य अविष्कार..!

खान्देश वार्ता-(धुळे)
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे गेल्या काही दिवसांपासून अश्वांचा बाजार भरला आहे. या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून अश्वांच्या विविध स्पर्धा होत आहेत. याच दरम्यान अश्वंच्या नृत्य अविष्कारांची स्पर्धा देखील भरवण्यात आली होती यामध्ये १५ अश्वांचा सहभाग नोंदवण्यात आला होता. डोळे दीपवणारे घोड्यांचे पदलालीत्य, त्यांचा डोलदारपणा, खाटेवरील मनवेधक नृत्य, आसमान झेप घेत नृत्य, अश्वावर उभे राहून मालकाने केलेले नृत्य अशा अनेक कला प्रकारांनी सारंखेडा चेतक फेस्टिवलमध्ये मोठी रंगत निर्माण झाली. फेस्टिवलचे वैशिष्ट्य असलेली अश्व नृत्य स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात हजारो अश्वप्रेमींनी त्यांचा नृत्य अविष्कार आपल्या मोबाईलच्या कॅमेरात देखील कैद केला.

IMG 20241219 WA0022

सारंगखेडा येथील एक मुखी श्री दत्त यात्रा उत्सवनिमित्त भरलेल्या चेतक फेस्टिवलमध्ये अश्व नृत्य स्पर्धा घेण्यात आली. यात १५ अश्वनी सहभाग घेतला होता. यातील तीन विजयी अश्वांची निवड करण्यात आली. यासाठी खास चेतक स्टेडियम तयार करण्यात आले होते. स्पर्धेच्या सुरुवातीला “राजू” नावाचा अश्व मैदानात आला. त्याने चौघे पाय मुडवत खाली बसून परीक्षकांसमोर नतमस्तक झाला. त्यानंतर मागील दोन पायावर उभे राहत संपूर्ण मैदानावर चालत सर्वांना सलामी दिली.

IMG 20241219 WA0029

तर बडोदा येथील “जोकर” नावाचा अश्व मैदानात आला. आणि आपल्या रुबाबदार चालीने सर्वांची दाद त्याने मिळविली. हलगीच्या तालावर त्याने नृत्य करण्यास सुरुवात केली. यानंतर परातीत उभे राहून नृत्य केले. तर बाजेवर बाज ठेवून नृत्य ही त्याने केले. यावेळी जोकर या अश्वांने उपस्थितांच्या जोरदार टाळ्या मिळविल्या. यानंतर सम्राट, मस्तानी, माया, शिवराज, केसरी, सूर्या, माही व काजोल या अश्वानीही चारही पाय हवेत उधळत नृत्य करण्यास सुरुवात केली. हलगी वादक थकले, थांबले पण अश्वंचे नृत्य काही थांबले नाही. मालकाच्या इशाऱ्यावर मिनिटे-मिनिटेला आपली चाल बदलत नृत्य करत र्वांना अश्व स्पर्धेने आश्चर्यचकित करून टाकले होते.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 − 12 =

Back to top button