
खान्देश वार्ता-(धुळे)
राज्यातील महायुती सरकारमधील भ्रष्टमंत्र्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे समर्थन करीत असून, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना पक्षाने या मंत्र्यांच्या विरोधात पुरावे देत, महायुती सरकारमधील महत्त्वाच्या खात्यांमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद भुषविणारे मुख्यमंत्र्यांचे संकट मोचन गिरीश महाजन यप्रकरणात हनी ट्रॅप प्रकरणात, संजय शिरसाठ यांच्या घरात बेडरूम मध्ये पैशाची बॅग असलेला तसेच कृषिमंत्री उच्च उत्तुंग माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात पत्ते खेळतानां व मंत्री भरत गोगावले यांचा अधोरी पूजा करतानांचे व्हिडिओ व्हायरल झाले.
तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या डान्सबारचा परवाना असताना त्या ठिकाणी बारबाला नाचविण्यात आल्या. या सर्व भ्रष्टमंत्र्यांनी पुरोगामी महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावित्र्य भंग केले असून या मंत्र्यांची पाठराखण मुख्यमंत्री फडवणीस हे करत असून त्यांनी अशा भ्रष्टमंत्र्यांना ताबडतोब पदावरून हटवावे अशी मागणी करीत सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.
धुळे जिल्हा शिवसेना वतीने धुळे जिल्हा संपर्कप्रमुख तथा उपनेते अशोक धात्रक यांच्या नेतृत्वात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथून या आंदोलनाला सुरुवात होऊन या आंदोलनाचे रूपांतर शिवसैनिकांच्या प्रचंड आग्रहामुळे मोर्चात झाले. मोर्चा हा नवी महानगरपालिका चौकात निदर्शने केल्यानंतर आग्रारोड मार्गे महाराणा प्रताप चौकात पोहोचला.
या ठिकाणी संतप्त शिवसेना पदाधिकारी व शिवसेनिकांनी भ्रष्टमंत्रांच्या प्रतिमेला शेण चोपडत महिला पदाधिकार्यांनी मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. या प्रसंगी शिवसेनेच्या वतीने भ्रष्टमंत्रांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना उपनेते शुभांगी पाटील जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, नरेंद्र परदेशी, भूपेंद्र लहामगे, भगवान करणकाळ, महानगर प्रमुख धीरज पाटील, प्रशांत भदाने, शानाभाऊ सोनवणे, किशोर वाघ, मंगेश पवार, भरत राजपूत यांच्यासह उबाठाचे पदाधिकारी व शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.



