क्राईमधुळे

धुळ्यात LCB ची खुर्ची हॉट! ‘वजन’ ठेवायला अधिकारी तयार, फिल्डिंग जोरात..!

खान्देश वार्ता-(धुळे)
धुळे जिल्हा पोलिस दलात नुकत्याच झालेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांनंतर आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष एकाच जागेकडे लागले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, अर्थात LCB.

LCB चा ताबा कोणाला मिळणार? या एका प्रश्नावर सध्या जिल्हा पोलिस वर्तुळापासून ते चहाच्या टपरीपर्यंत जोरदार चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या पोस्टिंगसाठी काही इच्छुकांनी कंबर कसली असून ‘कितीही वजन ठेवावे लागले तरी चालेल’ अशी थेट ऑफरच वरपर्यंत पोहोचवल्याची कुजबूज आहे.

का आहे LCB ला एवढी डिमांड..?
LCB म्हणजे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक ठेवणारी सर्वात महत्त्वाची शाखा. अवैध धंदे, वाळू माफिया, संघटित गुन्हेगारी यांच्यावर थेट कारवाईचा अधिकार. त्यामुळे ‘पॉवर’ आणि ‘पैसा’ दोन्ही मिळणारी ही जागा अनेकांसाठी ड्रीम पोस्टिंग आहे.

बदली प्रक्रियेत वरिष्ठ पातळीवरून हिरवा कंदील मिळवण्यासाठी सध्या जोरदार लॉबिंग सुरू आहे. काही नावांची चर्चा दबक्या आवाजात आहे. धुळे जिल्ह्यात चांगली पकड असलेले, राजकीय वजन असलेले आणि ‘मॅनेज’ करण्यात पटाईत असलेले अधिकारी या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जाते. तर गेल्या आठवड्यात इच्छुक जिल्ह्यातील एका वरिष्ठ अभ्यासू राजकिय नेत्यांची देखील भेट घेऊन आलेत.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, “LCB ला येण्यासाठी इच्छुक ३-४ जण आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. कोणाचे नशीब फळणार हे येत्या सोमवार पर्यंत कळेलच.”

नागरिकांमध्येही उत्सुकता..!
फक्त पोलिस दलच नाही तर सामान्य नागरिकांमध्येही नवीन LCB प्रमुख कोण असेल याबाबत कमालीची उत्सुकता आहे. कारण वाळू तस्करी, अवैध धंदे यांना आळा बसेल अशी अपेक्षा नागरिकांची आहे. ‘वजन’ ठेवून येणारा अधिकारी खरंच गुन्हेगारांवर ‘वजन’ टाकेल का, की फक्त खुर्ची उबवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मात्र जिल्ह्यात महिना भरापूर्वीच नवीन पोलिस अधीक्षक यांनी कारभार हाती घेतला. अजून त्यांना जिल्हा समजून घेण्यासाठी काही वेळ लागेलच यात शंका नाही. मात्र LCB वर नियुक्तीबाबत काय निर्णय घेतात, ‘मेरिट’ बाजी मारते की ‘वजन’, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आजपासून पुढील चार दिवस धुळे पोलिस दलासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − 3 =

Back to top button