क्राईमधुळे

धुळे शहरात वाहतूक नियंत्रणाऐवजी महामार्गावर लावताय ‘दीप’..! शासकीय वाहनात बियर रिचवत वसुली कामाचा श्रमपरिहार..!

खान्देश वार्ता-(धुळे)
शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कामकाज शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे हे आहे. मात्र वाहतूक शाखा वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी वसुलीतच मग्न असल्याची ओरड नित्याचिच आहे. तर शहर सोडून शहरालगतच्या नगांवबारी जवळील महामार्गावर दीपक ला लत लागली आहे.

वाहतूक शाखेचे काही कर्मचारी शहर सोडून महामार्गावर दिवे लावत आहेत. पर राज्यातील वाहनांना अडवून त्यांच्याकडून वसुली केली जात आहे. देवपूर नगावबारी जवळील सातपुडा हायस्कूलजवळ दररोज वाहतूक शाखेची एक गाडी उभी करून चार ते पाच कर्मचारी वाहनधारकांकडून बेकायदा वसुली करत असल्याचे चर्चिले जात आहे.

IMG 20250611 WA0008

या ठिकाणी वाटमाऱ्यांचा म्होरक्या म्हणून ओळख निर्माण झाली असल्याने रोज मोठ्या प्रमाणावर वसुली करत असल्याचीही चर्चा सर्रास होत आहे. दीपक वाहनधारकांचे काहीही एक न ऐकता वसुली न झाल्यास थेट दंड आकारतो. आणि संबंधित वाहन धारकाने एखाद्याला फोन केला तर आम्ही फक्त मंत्री अथवा साहेबांचे ऐकतो इतर कोणाचे ऐकण्यास आम्हाला वेळ नाही, असे सांगतो.

संशोधनाचा विषय ; पाचशे रूपये रोजाचे वाहन…!
विशेष म्हणजे वाहतूक शाखेचे वाहन हे कर्मचारी घेऊन येतात आणि सायंकाळपर्यंत या वाहनाचा रोज 500 रुपये द्यावा लागत असल्याची चर्चा आहे. हा आता संशोधनाचा विषय आहे. वाहतूक पोलिसांसोबत जर शासकीय वाहन असले तर वसुली मोठ्या प्रमाणावर होते, असे मानले जाते. त्यामुळे पाचशे रुपये रोजाने वाहतूक शाखेचे वाहन आणले जाते. वाहतूक शाखेतील कर्मचारी दिवसभर वसुली करून सायंकाळी अंधार पडल्यानंतर याच वाहनात बियरचा घोट रिचवत वसुली कामाचा श्रम परिहार करतात.

मंगळवारी बाजार समितीकडे लक्ष पुरवा…!
दर मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत साध्या वेषात वाहतूक शाखेतील पोलीस जाऊन वाहनधारकांकडून वसुली करीत असल्याची देखील कुजबूज धुळे शहरासह जिल्हाभरात होत आहे. केवळ जिल्हाच नाही तर नजीकच्या जिल्ह्यातही ही कुजबूज होत आहे कारण तेथूनही अनेक वाहने येथे दाखल होत असतात. धुळे शहर वाहतूक शाखेतील या दमदार कामगिरीकडे वरिष्ठांनी लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 4 =

Back to top button