क्राईमधुळे

दहा गुन्ह्यांचा आरोपी मोकाट.! बोराडीतील दारू तस्कर कमलेश वर उत्पादन शुल्क विभाग मेहरबान.?

खान्देश वार्ता-(धुळे)
धुळे जिल्ह्यात बनावट दारू व स्पिरिट तस्करीचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धुळे कार्यालयाअंतर्गत शिरपूर येथेही उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय कार्यरत असतानाही बोराडी (ता. शिरपूर) येथील दारू तस्कर कमलेश याचा बेकायदेशीर धंदा मात्र राजरोसपणे सुरू असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश हा बनावट दारू निर्मिती, दारू तस्करी तसेच स्पिरिटची अवैध वाहतूक अशा गंभीर बेकायदेशीर उद्योगांत गुंतलेला आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर धुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग, शिरपूर विभाग, नाशिक येथील भरारी पथक तसेच मुंबई येथील भरारी पथकाकडे मिळून जवळपास दहा गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. तरीदेखील तो कोणतीही भीती न बाळगता आपले अवैध धंदे उघडपणे चालवत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Screenshot 20260309 201653 Google

नुकतेच काही दिवसांपूर्वी नंदुरबार येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कमलेश ला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली होती. मात्र तेथून सुटल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करणे अपेक्षित असताना विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, उत्पादन शुल्क विभाग केवळ नावालाच कारवाया करून प्रसिद्धी मिळवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. छोट्या-मोठ्या कारवाया दाखवून वरिष्ठांना अहवाल दिला जात असला तरी प्रत्यक्षात धुळे जिल्ह्यात बनावट दारू निर्मिती केंद्रे, स्पिरिटचा साठा आणि परराज्यात दारूची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे आरोप होत आहेत.

या पार्श्वभूमीवर बोराडीतील दहा गुन्ह्यांमध्ये संशयित असलेल्या आरोपी कमलेश ला राज्य उत्पादन शुल्क विभाग कधी अटक करणार.? त्याच्यावर कठोर कारवाई होणार का.? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध दारू माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक स्तरावर जोर धरत आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven + nine =

Back to top button