क्राईमधुळे

धुळे पोलिसांनी सायबर गुन्ह्यातील तिघांच्या मुसक्या आवळल्या; महाराष्ट्र ऑइल कंपनीला ९५ लाखांचा घातला होता गंडा..!

खान्देश वार्ता-(धुळे)
शहरालगत असलेल्या अवधान औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र ऑइल एक्सट्रॅक्शन प्रा. लि. कंपनीचा संचालक असल्याचे भासवून कंपनीच्या लेखापालाकडून एका मोबाईल धारकाने आरटीजीएसद्वारे ऑनलाईन ९५ लाख रुपये मागवून घेत गंडा घातल्याचा प्रकार ऑक्टोबर महिन्यात घडला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तिघा ठगांच्या मुस्क्या आवळल्या असून त्यांच्याकडून ९५ लाखांची वसुली करण्यात आली आहे. तिघांना न्यायालयाने दिनांक २५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

8695e1b91ae70f8030656eeef606ee7e99009aa58500c05400404467c5402330

अवधान औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र ऑइल एक्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनी आहे. या कंपनीचे लेखापाल संजय भगीरथ अग्रवाल (रा. वल्लभनगर, धुळे) यांना दि.२३ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते कंपनीच्या कार्यालयात हजर असताना एका मोबाईल तारखाने त्यांना व्हाट्सअप द्वारे संदेश पाठवून तसेच व्हॉइस कॉल करून महाराष्ट्र ऑइल एक्सट्रॅक्शन प्रा. लि. कंपनीचे संचालक शैलेंद्र अग्रवाल असल्याचे भासवून लेखापाल संजय अग्रवाल यांच्याकडून नवीन प्रोजेक्ट साठी ॲडव्हान्स भरण्याचे सांगून ९५ लाख रुपये आरटीजीएस द्वारे ऑनलाईन मागवून घेतले.

यानंतर दि.२५ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास परत ८५ लाखांची मागणी करण्यात आल्यानंतर लेखापाल अग्रवाल यांनीही बाब कंपनीच्या इतर मालकांकडे सांगितली. तेव्हा त्यांच्यासोबत सायबर फ्रॉड झाल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर लेखापाल संजय अग्रवाल यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी मोबाईलवर संपर्क करून गंडा घालणाऱ्या अज्ञात ठगांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलमान्वये ठगबाजीचा गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश घुसर यांनी सुरू केला. त्यांनी अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करून गुन्ह्याचे अनुषंगाने तपास चक्री फिरविले. तांत्रिक तपासात गंडा घालणारे संशयित आरोपी हे नाशिक येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एक तपास पथक नाशिक येथे रवाना करण्यात आलेल्या पथकाने नाशिक येथून मुजम्मिल मुस्तक मणियार व सरफराज हुसेन शेख या दोघांना ताब्यात घेतले. तसेच चांदवड जि. नाशिक येथून आवेश रफिक पिंजारी यास पाठलाग करून पकडण्यात आले. तिघांच्या मुस्क्या आवळल्यानंतर त्यांना धुळ्यात आणण्यात आले. सायबर पोलिसांनी ठाण्यात पोलीस ठाण्यात तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. संबंधितांकडून ९५ लाखांची वसुली करण्यात आली.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश घुसर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील व पथकातील भूषण खलाणेकर, राजू मोरे, तुषार पोतदार, चेतन सोनगिरे, प्रसाद वाघ, विवेक बिराडे, महिंद्र जाधव यांनी केली आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − 9 =

Back to top button