क्राईमधुळे

धुळे एलसीबी पोलिस निरीक्षक पवारांच्या त्रासाने सरग यांचा मृत्यू; कुटुंबाचा आरोप..!

खान्देश वार्ता-(धुळे)
जिल्हा पोलीस दलातील महत्वपुर्ण शाखा स्थानिक गुन्हे शाखेची ओळख असते. जिल्हाभरात कारवाईसाठी हा विभाग महत्त्वपूर्ण मानला जातो. मात्र याच विभागातील पोलीस निरीक्षकांच्या मानसिक व शारीरिक छळामुळे दलातील हवालदार संदीप सरग यांचा मृत्यू झाला असा आरोप पत्नी स्वाती संदिप सरग यांनी कुटुंबासह जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे निवेदनातून केली आहे. तसेच पतीच्या मरणास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार कारणीभूत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी ही सरग यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. तर याबाबत कारवाई न झाल्यास कुटूंबांसह जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

 याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना सरग कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझो पती संदिप धनाजी सरग हे गेल्या २५ वर्षापासून जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांचे काम प्रामाणिक आहे. मात्र जुन-२०२४ मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस निरीक्षक पदावर श्रीराम पवार हे रुजू झाल्यापासून ते पतीचा मानसिक व शारीरिक छळ करीत होते. कारवाई दाखवा अन्यथा मुख्यालयात जमा करेल, असा सज्जड दम अधिका-यांकडून येत होता. त्यामुळे माझो पती नेहमीच मानसिक त्रासले होते. याबाबत ते मला देखील सर्व सांगत असतं. तसेच त्यांची कोणतीही चुक नसतांना पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती.

 असे असतांना देखील माझया पतीला पोलीस अधिकारी पवार हे पोलीस मुख्यालयातून बोलवून कारवाईसाठी पाठवित होते. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पती मानसिक त्रासले होते. तर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी आपल्या पतीला मानसिक व शारीरिक त्रास दिला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. असा आरोप मयत पोलीस कर्मचारी संदिप सरग यांच्या पत्नीसह कुटूंबियांनी केला आहे. या घटनमुळे आता जिल्हा पोलीस दलाचे नाक असलेले स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहे.

 तर गुन्हे शाखेत काम करायचे असेल तर कामगिरी दाखवा अन्यथा मुख्यालयात रवानगी केली जाईल. असा सज्जड दम भरला जात असल्याची माहिती पोलीस दलातील सुत्रांनी दिली आहे. मात्र मयत संदीप सरग यांच्या पत्नीसह कुटूंबियांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे निवेदनातून आपली कैफियत मांडली आहे. यावर आता पोलीस अधिक्षक दलाची प्रतिमाला डाग लागू नये यासाठी काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अन्यथा सरग कुटूंबांच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाबाहेर आमरण उपोषणला बसतील का.? हे आता लवकरच स्पष्ट होईल.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × four =

Back to top button