खान्देश वार्ता-(धुळे)
नवापूर रेल्वे स्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी एक महिला पुरुष कापला गेल्याने भीषण अपघात झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.
नवापूर रेल्वे स्थानकावर ४४ वर्षीय पुरुष व ४० वर्षीय महिला आल्याने ते रेल्वेखाली कापले गेल्याने भीषण अपघात झाला. एक्सप्रेस रेल्वे खाली पुरुष आणि महिला कापले गेल्याने दोन्हींच्या शरीराची अवयव विच्छिन्न अवस्थेत रेल्वे रुळावर रेल्वे पोलिसांना मिळून आलेत. अपघातात मृत्यू झालेली महिला आणि पुरुषाची ओळख पटली नसून नवापूर रेल्वे पोलीस त्यांची ओळख पटवीत आहेत.
नवापूर रेल्वे स्थानकावर झालेल्या विचित्र अपघात आणि परिसरामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दोन्हींचा अपघात झाला आहे की, त्यांनी आत्महत्या केली आहे. याबाबत अजून कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही. आणि दोघांचे नाव, गाव कळू शकले नाही. या संदर्भात नवापूर रेल्वे पोलीस तपास करीत आहेत.