क्रीडानंदुरबार

International mountaineer Anil Vasave scaled Mt Spangnagari and Kyagari Peak

खान्देश वार्ता-(धुळे)
माउंट एव्हरेस्टवर चढाईसाठी निवड झाली असताना शिखर चढताना अपघात झाला. त्यामुळे मोहीम अपूर्णच राहिली. त्यातच मागील महिन्यात अचानक पत्नीचे निधन झाले. अशा परिस्थितीतही खचून न जाता आदिवासी समाजातील पहिला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक असलेल्या सातपुड्यातील छोट्याशा गावातील अनिल वसावे याने केवळ सहा दिवसात प्रत्येकी सहा हजार मीटर उंचीचे असलेले लेह लडाखमधील माउंट स्पंग्नगरी व कियागरी हे दोन शिखर सर करून एक ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.

IMG 20240830 175429

सातपुड्यातील दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट हे गाव आहे. या गावाला जाण्यासाठी अद्यापही पक्का रस्ता नाही. तेथील अनिल वसावे यांना लहानपणापासूनच डोंगर चढणे आवडायचे. त्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले. त्यासाठी प्रयत्न करू लागले. अनेक चढ उतारानंतर किलीमांजारो. माउंट एव्हरेस्ट बेस कँप, माउंट कालापथर, माउंट एल्ब्रस माउंट सतोपंथ ही शिखर यशस्वी सर केली.

IMG 20240830 175413

२०२३ मध्ये घरची परिस्थिती हालाखीची असताना. मित्रांच्या सहकार्याने. अनिल वसावे याची माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी निवड झाली होती. परंतु शिखर ३०० मीटर असताना खराब वातावरणामुळे अनिल याला अपघात झाला होता. यामुळे अनिल वसावे याने मोहिमेतून माघार घेतली होती. दरम्यान संकटाची मालिका अनिल वसावे यांच्यासमोरून जात नव्हती. जुलै २०२४ मध्ये त्यांच्या पत्नीचे दुखद निधन झाले. मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी स्वतःला सावरत. पतीच्या निधनानंतर महिनाभराच्या आत एवरेस्ट सर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचाच एक भाग म्हणून केवळ सहा दिवसात प्रत्येकी सहा हजार मीटर उंचीचे असलेले लेह लडाखमधील माउंट स्पंग्नगरी व कियागरी हे दोन शिखर सर केली.

लेह लडाख मधील माउंट कियागरी ६ हजार १०० मीटर
व स्पंगनागरी ६ हजार २०० मी. उंच असलेल्या शिखरावर आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे गिर्यारोहक याची यशस्वी चढाई केली. मोहिमेदरम्यान होणारी बर्फवृष्टी, उने ५अंश तापमान, लागणारा दम हे सगळं सहन करत रात्री एक वाजता अंतिम चढाई केली. दि.२० ऑगस्ट रोजी सुरू केलेली मोहीम २६ ऑगस्ट रोजी पूर्ण केली.

या आधीही गिर्यारोहक अनिल वसावे यांनी किली मांजारो माउंट एव्हरेस्ट बेस कँप, माउंट कालापथर, माउंट एल्ब्रस माउंट सतोपंथ ही शिखर यशस्वी सर केली आहेत. आदिवासी समाजातील अनिल वसावे हा पहिलाच आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आहे. त्याचा निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक संकटांचा सामना करत आलेले दुःख बाजूला करीत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − 12 =

Back to top button