खान्देश वार्ता-(धुळे)
जिल्ह्यातील शिरपूर येथुन अहमदनगरकडे एका कारमधून मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवणारा मादक पदार्थाची (गांजा) तस्करी रोखण्यात धुळे तालुका पोलिस ठाण्याततील पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील व पथकाला यश आले.
या कारवाईत ३ लाख रूपये किंमतीच्या कारसह २ लाख ४२हजार रूपये किंमतीचा गांजा मिळुन एकूण ५ लाख ४२ हजार रूपयांचा मुद्देमाल धुळे तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अभिषेक पाटील यांना मुंबई-आग्रा महामार्गावरून (एमएच०४जी.जे.३३८४) क्रमांकाच्या स्वीफ्ट कारमधून एक इसम गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून पथकास कारवाई करण्याच्या सुचना केल्या. पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी दुरक्षेत्र कार्यालयाजवळ बॅरिगेट लावून सापळा रचला. तर रात्रीच्या सुमारास वरील क्रमांकाची संशयीत कार पथकास येतांना दिसली. या कारला थांबवीत चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पथकाने कारची तपासणी केली असता यात पथकाच्या हाती प्लास्टीकच्या गोणीत भरलेला मादक पदार्थ (गांजा) हाती लागला.
सदर गांजाची किंमत २ लाख ४२ हजार रूपये एवढी असून तो मोजणीत ११ किलो एवढा वजनाचा भरला. या कारवाईत ३ लाख रूपये किंमतीच्या वाहनासह २ लाख ४२ हजार रूपये किंमतीचा गांजा मिळुन एकूण ५ लाख ४२ हजार रूपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात कारचालक अन्सार मुसा पठाण (रा.तुळजापूर देवी मंदिराजवळ, बुरहाननगर, अहमदनगर) याचेवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोसई विजय पाटील करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबरे, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील व पथकातील विजय पाटील, रवींद्र सोनवणे, कुणाल शिंगाने, महेंद्र गिरासे, राकेश मोरे, राहुल देवरे, सुरेंद्र खांडेकर, योगेश पाटील, राजेंद्र पावरा, महेंद्र पाटील व जयेश पाटील या पथकाने केली. तसेच हा गांजा नेमका कुठून आणला. आणि कुठे व कोणासाठी घेऊन जात होता. याबाबतचा सविस्तर तपास धुळे तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील हे करीत आहे.