
खान्देश वार्ता-(धुळे)
धुळे जिल्हा पोलिस दलात ईमानदारांसोबतच बेईमानांची सुद्धा संख्या कमी नाही. मात्र बेईमांनांपैकी काही कोणत्या प्रकरणात माती खावी आणि कोणत्या प्रकरणात खाऊ नये, याचे किमान भान ठेवतात. पण चटावलेले सराईत काही मात्र काहीच पाहत नाही. पीडिताला न्याय मिळो अगर न मिळो आपले कर्तव्य आणि ईनाम गहाण ठेवत ते आर्थिक फायदा करून घेत असतात.
शून्य वर्गाने दाखल झालेल्या शारीरिक शोषणाच्या गुन्ह्यात तपासाधिकाऱ्याने आरोपीला अभय दिले आहे. कारण या गणेशाला संत्री खूप प्रिय आहेत. आणि या गुन्ह्यातील आरोपी हा तपासाधिकारी आणि वकीलाला नागपूरच्या संत्री पुरवत आहे. फोन पे-वर त्याने सुरुवातीला ६० संत्री टाकल्या.
त्यापैकी वकिलाने १० संत्री आपल्याकडे ठेऊन घेत ५० संत्री तपासाधिकाऱ्याला दिल्या आहेत. आता उर्वरित ५० संत्री मिळाल्यावर आरोपीवरील आरोप कायमचे रफादफा करण्यात येतील. कोर्ट कचेरीची कायमची झंझट मिटेल आणि उपराजधानीचा धुळ्याशी संपर्क कायमचा तुटणार आहे.