क्राईमनंदुरबार

नवापूर मधील लाचखोर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे एसीबी च्या ताब्यात

खान्देश वार्ता-(धुळे)
गुजरात राज्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला अटक न करण्यासाठी ५० हजाराची लाच स्विकारतांना नवापूरचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने बुधवार (दि.२४) रोजी रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या कामकाजावर नाराज असलेल्या नवापूर मधील नागरिकांनी नवापूर पोलिस स्टेशनच्या आवारात रात्रीच्या सुमारास एकत्र येत अधिकारी वारे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. ज्ञानेश्वर वारेंना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक वाहनातून नंदुरबारकडे रवाना होत असतांना संतप्त नागरीकांनी पोलीस वाहनावर दगडफेक केली. पोलीस निरीक्षक वारेंच्या हुकूमशाहीतून नवापूर तालुका मुक्त झाल्याच्या घोषणा देत नागरिकांनी जल्लोष व्यक्त केला.

IMG 20240425 WA0009

पोलिस निरीक्षक वारे यांची कारकीर्द यापूर्वी ही वादग्रस्त ठरली आहे. धुळे जिल्ह्यातील सोनगीर, चाळीसगाव रोड व दोंडाईचा पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना (दि.१) एप्रिल २०२१ रोजी दोंडाईचा शहरात तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी जमाव पोलीस ठाण्यावर चालून आला होता. याचवेळी अधिकारी वारे यांनी हवेत गोळीबार केल्यामुळे मोठा वाद उठला होता. तर आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात अधिकारी लाच घेऊनच सर्व कामे करत असल्याचे या घटनेवरून अधोरेखित झाले असल्याचे नागरिकांचे मत आहे.

गुजरातमधील गुन्ह्यात असलेल्या संशयीताला अटक न करण्यासाठी संबंधीतांकडून नवापूर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र यापैकी एक लाख रुपये ज्ञानेश्वर वारेंना मिळाले होते. परंतू उर्वरीत बाकी असलेली रक्कम मिळण्यासाठी संबंधीतांकडून ते मागणी करीत होते. मात्र याबाबत तक्रारदार यांनी अधिकारी वारे यांच्या विरोधात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणीअंती बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून ५०हजाराची लाच स्विकारतांना पोलिस निरीक्षक वारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

या प्रकरणात ज्ञानेश्वर वारे रंगेहाथ सापडल्याची वार्ता नवापूर शहरात वाऱ्यासारखी पसरताच नवापूर पोलिस स्थानक परिसरात शेकडोंचा जमाव जमला होता. वारे यांनी हुकूमशाही पद्धतीतून नवापूर तालुक्यातील नागरीकांवर खोटे गुन्हे दाखल करुन निष्पाप लोकांना आरोपी केल्याचा आरोप ही नागरिकांनी यावेळी केला आहे.

IMG 20240425 110021

शिवमहापुराण कथाकार ललीतजी नागर यांची कथा सध्या सुरत येथे सुरु आहे. कथा सुरु असतांना पोलिस निरीक्षक लाच घेतांना सापडल्याची माहिती श्री. ललीतजी नागर यांना मिळाल्यानंतर सुरत येथील कथेत नवापूर येथील कथेतील प्रकार विषद करीत जैसी करनी वैसी भरनी असे त्यांनी सांगितले.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

One Comment

  1. Good coverage of corrupted people .Through. media people come to know what type of the people are around us.mr Ware was posted at Songir police station and he had dispute with Mr Subhash Deore.That time he had good impression among people that he is strict and non corrupted. Person but the police without corruption is impossible.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten + 19 =

Back to top button