अन्य घडामोडीधुळे

काँग्रेसकडून धुळ्यात आदिवासी न्याय मेळावा..!

खान्देश वार्ता-(धुळे)
आदिवासी हाच देशाचा मुळ मालक असल्याचे काँग्रेसचे नेते खा. राहूल गांधी सांगत आहेत मात्र भाजप आदिवासी समाजाचा सत्यानाश करीत आहेत. आदिवासी समाजाला नष्ट करण्याचे काम भाजपा करीत आहेत. आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती आहेत म्हणून दौपदी मुर्मू यांना संसदभवनाचे उद्घाटन, रामलल्लाची प्राणप्रतिष्ठेला बोलविले नाही, मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी, धुळ्याचे खा. सुभाष भामरे, खा. हिना गावीत हे एकही शब्द बोलले नाहीत म्हणन भाजपाचा पराभव करुन मणिपूरचा बदला घ्यायचा आहे.

भाजपाला मत म्हणजेच आदिवासी समाजाचा घात असा घणाघात आदिवासी समाजाच्या नेत्यांनी इंडीया आघाडीच्या आदिवासी न्याय मेळाव्यात केला. दरम्यान गांधी परिवार आणि आदिवासी बांधव यांचे पूर्वीपासूनच कौटूंबिक नाते राहिले आहे. संविधानात बदल करुन आदिवासींचे हक्क हिसविण्याचे काम भाजप करीत असल्याचे विधीमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी या मेळाव्यात सांगितले.

इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. सौ. शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळे काँग्रेसकडून धुळ्यात आदिवासी न्याय मेळाव्याचे दि.२३ एप्रिल रोजी दुपारी २ वा. आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, माजी खा. बापू चौरे, मा.आ.शरद आहेर, उमेदवार शोभाताई बच्छाव, शिवसेना प्रमुख अतुल सोनवणे, हेमंत साळुंखे, महेश मिस्त्री, हिलाल माळी, शुभांगीताई पाटील, माजी आ.प्रा.शरद पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजित भोसले, जोसेफ मलबारी, प्रथम महापौर भगवान करनकाळ, आदिवसी काँग्रेसे जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे, आदि उपस्थित होते.

Adivasi 1

यावेळी उपस्थित आदिवासी समाजातील नेत्यांनी भाजपावर हल्लाबोल चढवित सांगितले, मुळ मालक आदिवासी समाजाला वनवासी बनविण्याचे काम भाजपा करीत आहे. उद्योगपतींना जंगल, जमीन विकण्याचे काम सुरु आहे. मणिपूरमध्ये आपल्याच आदिवासी बघिनींवर अत्याचार झाले मात्र भाजपाचे पंतप्रधान अद्यापही तेथे गेले नाहीत. किंवा खासदार सुभाष भामरे, खा. हिना गावीत एकही शब्द बोलले नाहीत. त्यामुळे धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये भाजपाचा परभाव करुन मणिपूरचा बदला घ्यायचा असल्याचा घणाघात यावेळी मेळाव्यात आदिवासी नेत्यांनी केला.

मेळाव्यात विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले कि, गांधी परिवाराचे आणि आदिवासी बांधवांचे कौटूंबिक नाते आहे. देशाचा मुळ मालक असलेल्या आदिवासी बांधवांसाठी घर मिळावे म्हणून देशात सर्वप्रथम स्व. इंदिरा गांधी यांनी इंदिरा आवास योजना राबवून आदिवासी बांधवांना घरे दिली. कॉग्रेसचे सरकार असतांना आदिवासी बांधवांच्या प्रत्येक योजना प्रभावीपणे राबवून घरापर्यंत त्यांना लाभ मिळवून दिला. आदिवासी बांधवांना जमीनी मिळाव्यात म्हणून काँग्रेस सन २००६मध्ये वनपट्टयाचा कायदा करुन आदिवासींना वनपट्टे वाटले.

सत्ताधारी भाजपाकडून वारंवार आदिवासी समाजाचा आणि त्यांच्या अस्मितेचा अपमान केला जात आहे. मणिपूरमध्ये अत्याचार होत असतांना पंतप्रधान तेथे गेलेच नाही मात्र आदिवासी बांधवांचे दुख जाणून घेण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी काँग्रेसचे खा. राहूल गांधी मणिपूरमध्ये जावून आदिवासी बांधवांचे दुख जाणून घेतले. आदिवासींचे हक्क हिरावून घेत त्यांना मुळ मालक म्हणून संपविण्याचे काम भाजपा करीत असल्याचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक, आ. कुणाल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना विजयी करण्याचे आवाहन केले. तर जन्मभूमी आणि मातृभूमी असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन शोभा बच्छाव यांनी केले.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 4 =

Back to top button