धुळेअन्य घडामोडी

विद्रोही साहित्य संमेलनात उत्सव नव्हे, तर विचारांची उधळण.!

(खान्देश वार्ता)-धुळे
विद्रोही साहित्य संमेलनात उत्सव नव्हेतर विचारांची उधळण होईल. घरुन भाकरी खावून विचार पुढे येणारे आपण असून शासनाचे कोणतेही अनुदान न घेता अथवा धनाढ्यांकडून देणग्या गोळा न करता एक मुठ धान्य आणि एक रुपया सामान्यांकडून घेवून त्यांचा सहभाग महत्वाचा मानत हे संमेलन अमळनेर येथे दि.३ व ४ फेब्रुवारी रोजी आयोजीत करण्यात आले आहे.

संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ग्रामिण साहित्यिक प्रा.डॉ.वासुदेव मुलाटे हे आहेत. या साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने आज बुधवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या दरम्यानच्या आग्रारोडवरुन संदेश यात्रा काढण्यात येईल अशी माहिती कॉ.किशोर ढमाले, विद्रोही मराठी साहित्य संमलेनाचे प्रवर्तक अविनाश पाटील, खान्देश साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.सदाशिव सूर्यवंशी, अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा.भगवान पाटील आणि व्रिदोही सांस्कृतीक  चळवळ राज्य कार्यकारणीचे सहसमन्वयक एल.जे. गावीत यांनी पत्रकार परिषद घेवून दिली.

IMG 20240123 173221यावेळी कॉ.किशोर ढमाले म्हणाले की, खान्देशातील अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी रोजी १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत असून या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिध्द हिंदी व्यंग कवी संपत सरल यांच्याहस्ते होईल. तर प्रख्यात उर्दू साहित्यीक रहेमान अब्बास हे प्रमुख पाहुणे म्हणून असतील. अमळनेर ही कर्मभुमी असलेल्या साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या पार्श्वभुमीवर विद्रोही साहित्य संमेलनाचे आशय सुत्र प्रेममय सत्यधर्म आणि समता,स्वातंत्र बंधुता या मुल्य समर्थनार्थ आहे.

महाराष्ट्रात विद्रोही सांस्कृतीक चळवळीच्या माध्यमातून आतापर्यंत मुंबई,कोल्हापूर, सोलापूर, अमरावती,नंदुरबार, सिंधूदुर्ग, धुळे या ठिकाणी व्रिदोही साहित्य संमेलने आयोजीत केली गेली आहे. बाबुराव बागुल, वाहरु सोनवणे, डॉ.यशवंत मनोहर, डॉ.अजीज नदाप, आत्माराम राठोड, तारा रेड्डी, तुलसी परब,जयंत पवार, डॉ.आ.ह.साळूंखे, उर्मिला पवार,प्रा.डॉ.आनंद पाटील, गणेश विसपुते, चंद्रकांत वानखेडे या सर्जनशील प्रगतीशिल साहित्यिक नाटककार, कवी समीक्षकांनी संमेलनाचे अध्यक्षपदे भूषवित विद्रोही साहित्य संस्कृतीचा आवाज बुलंद केला आहे.

अंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्क्सवादी विचारवंत डॉ.एजाज, प्रसिध्द शायर निदा फाजली, डॉ.उमा चक्रवती, सुशिला टाकभौवरे, जयंत परमार, गोहार रझा, रसिका आगाशे, आदींनी विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन करुन विद्रोही जागरात आपला सहभाग नोंदविला आहे.अठराव्या साहित्य संमेलनाचे डॉ.वासुदेव मुलाटे यांची विश्ववृक्षाच्या मुळ्या ही कादंबरी, व्यथा फुल, आधार रंग,  झाड आणि संमंध हे कथासंग्रह, झोकाळलेल्या वाटा हे आत्मकथन यासह विपुल लेखन प्रसिध्द केले आहे. अमळनेर येथील धुळे रोडवरील आर.के. नगरच्या समोरील भव्य प्रांगणात हे संमेलन होणार आहे. दोन दिवस चालणार्‍या या  संमेलनात परिसंवाद,कवी संमेलने,गटचर्चा ,कथाकथन युवामंच, गझल संमेलने, नाटक , एकपात्री,बालमंच, विचार यात्रा यांची रेलचेल असणार आहे.

IMG 20240123 173221विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी अमळनेर सह खान्देशातील धुळे जिल्ह्यातील विद्रोही साहित्यीक समविचारी नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते योगदान देत आहेत. त्याचाच भाग म्हणून संमेलनाच्या आयोजनात आणि संयोजनात सर्वसामान्यांचा देखील हातभार लागावा, प्रातिनिधीक योगदान मिळावे यासाठी एकमुठ धान्य दान आणि एक रुपया देणगी मोहिम धुळे शहरातून ऐतिहासिक आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी पुतळा रोडवरुन महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत आवाहन करीत आज दुपारच्या आयोजीत केले आहे. यापत्रकार परिषदेला वरिल मान्यवरांसह मराठी नाट्य परिषदेचे राज्य पदाधिकारी चंद्रशेखर पाटील, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष मनोज गर्दे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × four =

Back to top button