अन्य घडामोडीधुळे

भाजप खोटं बोलण्यात नेहमी पुढे असतो; काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार डॉ.शोभा बच्छाव

खान्देश वार्ता-(धुळे)
देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही त्यामुळे अराजकता वाढली आहे. काँग्रेस पक्षाने विविध उद्योग व्यवसायातून देश आणि देशातील प्रकल्प उभे केले मात्र भाजपाने देश विकायला काढला आहे. त्यामुळे देशातील सत्तास्थानावरुन भाजपाला हटविण्यासाठी जनतेमध्ये प्रचंड उत्साह असून इंडिया आघाडीच्या उमेदवारांना लोकसभा निवडणूकतीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी सांगितले. दरम्यान धुळे शहर माझी जन्मभूमी असून येथेच माझे प्राथमिक शिक्षण झाले आहे. धुळ्याची पालकमंत्री असतांना अनेक विकासाचे निर्णय घेतले त्यामुळे धुळे लोकसभा हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे त्यामुळे आता आपल्याला शेतकरी, महिला, युवकांसाठी लढायचे असून जिंकायचेही असल्याचा विश्वास महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सौ. शोभाताई बच्छाव यांनी धुळ्यात व्यक्त केला.

धुळे लोकसभा निवडणूकितील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. शोभाताई दिनेश बच्छाव यांच्या प्रचारार्थ शुक्रवार (दि.१९) रोजी आ. कुणाल पाटील यांच्या देवपूर धुळे संपर्क कार्यालयासमोरील सभागृहात महाविकास आघाडी व मित्र पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकिला काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, उमेदवार डॉ.सौ. शोभाताई बच्छाव, माजी खा. बापू चौरे, माजी आ.प्रा.शरद पाटील, काँग्रेसच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे, महाराष्ट्र काँग्रेसचे माजी आ. शरद आहेर, माजी आ.डी.एस. अहिरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेशभाऊ मिस्त्री, हिलाल माळी, प्रथम महापौर भगवान करनकाळ, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष गुड्डूभाऊ कक्कर, जमिल मन्सूरी, ज्येष्ठ पत्रकार हेमंतभाऊ मदाणे, महेश घुगे, काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज करनकाळ, जोसेफ मलबारी, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष हीतेंद्र पवार, सौ. शुभांगी पाटील, प्रा. जसपाल सिसोदिया, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, माजी सभापती गुलाबराव कोतेकर, संचालक साहेबराव खैरनार, धुळे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, भगवान गर्दे आदी उपस्थित होते.

IMG 20240419 WA0088

यावेळी आ. कुणाल पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असून डॉ. शोभाताई बच्छाव यांचा विजय निश्चित आहे. लोकसभा निवडणूकित काँग्रेस पक्षाने दिलेला जाहिरनामा हा जगातील सर्वोकृष्ठ जाहिरनामा आहे. देशाहिताचे अभिवचन त्यात काँग्रेस पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे. काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपाला सडेतोड उत्तर देणे गरजेचे आहे. गेल्या सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने देशाला उभे केले, नवनवीन प्रकल्प आणून देशाची प्रगती केली.

मात्र हेच प्रकल्प गहाण ठेवून भाजपा देश विकायला निघाला आहे. महागाई, बेरोजगारी वाढली असून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव नाही. त्यामुळे शेतकरी दुखी आहे. महाविकास आघाडीने धुळे लोकसभेसाठी राजकारण आणि प्रशासनाच अनुभव असलेल्या सक्षम उमेदवार दिलेल्या असून रखडलेल्या विकासासाठी डॉ. शोभाताई बच्छाव यांनी विजयी करावे असे आवाहन आ. कुणाल पाटील यांनी केले.

IMG 20240419 WA0033

काँग्रेसच्या धुळे लोकसभा उमेदवार डॉ.शोभाताई बच्छाव यांनी सांगितले, भाजपा आणि त्यांचे कार्यकर्ते खोटे बोलण्यात नेहमी पुढे असतात, मी बाहेरच्या जिल्ह्याची असल्याचे सांगुन सामान्य मतदारांची दिशाभूल करीत आहेत. मात्र मी या ठिकाणी स्पष्ट करते की, माझा जन्म धुळे शहरात झाला असून माझे प्राथमिक शिक्षण धुळे शहर आणि फागणे (ता. धुळे) येथे झाले आहे, माझी मावशी धुळ्यात राहते, माझे आजोळ धुळे आहे. तसेच माझे सासर कसमादे पट्ट्यात असून माहेर मालेगाव तालुक्यातील आहे.

धुळ्याची पालकमंत्री असतांना जिल्हयाच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे मी खान्देशची कन्या असून धुळे लोकसभा हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याचे डॉ. शोभाताई बच्छाव यांनी सांगितले. लोकसभेत बेरोजगार, महिला आणि शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न माडणार आहे. आज कांदा पिकाला हमीभाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांचा प्रत्येक शेतीमालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. केंद्रातील भाजप सरकार हे शेतकरीविरोधी सरकार असून त्यांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ असल्याचे डॉ. शोभाताई बच्छाव यांनी सांगितले. यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पंढरीनाथ पाटील यांनी तर सुत्रसंचालन धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे यांनी केले.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five + six =

Back to top button