धुळेसामाजिक

धुळ्यात मोहम्मद रफी व किशोरकुमार यांच्या गाण्यांचा “यादगार लम्हे” कार्यक्रम..!

खान्देश वार्ता-(धुळे)
संगीत विश्वातील बादशाह मोहम्मद रफी आणि किशोरकुमार यांना जे ऐकतात, ते त्यांचे कायमचे चाहते होतात. आजही लोकांना त्यांची गाणी ऐकायला खूप आवडतात. तर किशोरकुमार यांनी बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ११५ गाणी गायली आहेत. हे सर्व गाणी सुपरहिट ठरली आहेत. दि.३१ जुलै १९८० मध्ये मोहम्मद रफी यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांची नुकतीच ३१ जुलैला रोजी ४४ वी पुण्यतिथी होती. तर दुसरीकडे आपल्या अभिनयाने आणि आवाजाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गायक किशोरकुमार यांची रविवार दि.४ ऑगस्ट रोजी ९५ वी जयंती आहे. सन ४ ऑगस्ट १९२९ रोजी किशोरकुमार यांचा मध्यप्रदेशात जन्म झाला होता. त्यांनी हिंदीसह बंगाली, मराठी. आसामी, गुजराथी यासह इतर विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

IMG 20240801 100303

या दोन्ही संगीत क्षेत्रातील कलाकारांच्या आवठणींना उजाळा देण्यासाठी धुळे शहरासह जिल्हयातील संगीत प्रेमी रसिकांसाठी गेल्या ३० वर्षापासून संगीत क्षेत्रात असलेले संगीत प्रेमी श्री.रुपेंद्र तावडे प्रस्तुत स्वरमोहिनी कराओके गृपतर्फे श्रध्दाजंली अर्पण करण्यासाठी यादगार लम्हे हा कार्यक्रम शनिवार दि.३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यत शहरातील राजर्षी शाहू नाटयमंदिरात मोहम्मद रफी आणि किशोरकुमार यांच्या सुमधून गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.

 

IMG 20240801 101516

शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही संगीतप्रेमीनी स्वरमोहिनी कराओके क्लासमध्ये संगीताचे प्रशिक्षण घेऊन या कार्यक्रमात आपली गाणी साकारण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे आपले दैनंदिन कामकाज सांभाळून हे नवनिवेदित कलाकार आपल्या अंगी असलेली कला धुळेकरांसमोर सादर करणार आहेत.

 या कार्यक्रमात धुळेकरांची संगीताची आवड लक्षात घेता संगीतातील बादशाह म्हणून ओळख असलेले मोहम्मद रफी ज्यांनी २६ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. आणि त्याचबरोबर मेरे सपनो की राणी या गाण्याने ओळख असलेले किशोरकुमार यांनी देखील २ हजारांहून अधिक हिंदी गाणे व त्यानंतर इतर भाषेत गाणी गायली आहेत.

IMG 20240801 101646

 मात्र हे आकडे सोपे वाटत असले तरी ते एखाद्या पराक्रमापेक्षा कमी नाही. भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना रफी साहेबांचे गायन खूप आवडायचे. मोहम्मद रफी यांनी सर्व प्रकारची गाणी गायली आहेत. जी ऐकून लोक त्यांच्या गायनाचे चाहते झाले होते. अशातच एक गाणे आहे की, जे गाताना ते खूप भावूक झाले होते. गातानाच त्यांच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली होती. १९६८ मध्ये आलेल्या  ‘नीलकमल’ चित्रपटासाठी ‘बाबुल की दुआं लेती जा’ हे गाणे रेकॉर्ड करताना रफींच्या डोळ्यात अश्रू आले होते.

यामुळे संगीत क्षेत्रातील गायनतील बादशाह म्हणून ओळख असलेल्या मोहम्मद रफी आणि किशोरकुमार यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी धुळयातील रसिक प्रेमींनी शनिवारी राजश्री शाहू नाटय मंदिरात सांयकाळी यादगार लम्हे या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहावे असे आवाहन स्वरमोहिनी कराओके गृपचे संस्थापक रुपेंद्र तावडे यांनी केले आहे.

 

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five − 1 =

Back to top button