अशी ही बनवाबनवी : नंदुरबारच्या महाविकास आघाडीच्या रॅलीत नाचले शिंदे गटाचे कार्यकर्ते
खान्देश वार्ता-(धुळे)
राज्यात भाजपा, शिंदेची शिवसेना व राष्ट्रवादी यांची युती आहे. महायुतीतर्फे लोकसभा एकत्रितपणे निवडणूक लढवीत आहे. असे असले तरी नंदुरबार मध्ये महायुतीमध्ये संघर्ष सुरूच असून गुरुवारी निघालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या रॅलीत शिंदे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी नाचत असल्याचे चित्र दिसून आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीतील संघर्षाकडे राज्यस्तरीय नेत्यांनीही पाठ फिरवली आहे का? अशी चर्चा जिल्हाभर रंगली आहे.
नंदुरबार लोकसभेसाठी महायुतीतर्फे भाजपातर्फे डॉ. हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या उमेदवारीला शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोध केला होता. त्यांची उमेदवारी बदलण्याची मागणी ही त्यांनी केली होती. मात्र त्यांनी केलेल्या कामाचा जोरावर त्यांना उमेदवारी देण्यात आली. राज्यभर विविध जागांसाठी महायुतीत चुरस पाहायला मिळाली. त्यानंतर त्या ठिकाणी आपसातील वाद राज्यस्तरीय नेत्यांच्या मध्यस्थीने सोडवण्यात आले. मात्र नंदुरबार जिल्ह्यात भाजपा व शिंदे गटात असलेला वाद सोडवण्याकडे मात्र वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
काँग्रेसतर्फे आमदार के.सी.पाडवी यांचे सुपुत्र ॲड.गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. या उमेदवारीनंतर शिंदे गटातील कार्यकर्ते नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यासह तालुका अध्यक्ष विविध पदाधिकारी हे काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सक्रिय झाले.
काल गुरुवारी नंदुरबार येथे काँग्रेसचे उमेदवार अँड. गोवाल पाडवी यांनी शक्ती प्रदर्शन करत बैलगाडीवर जात जिल्हाधिकारी कार्यालयात महाआघाडीच्या नेत्यांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या रॅलीत शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेसच्या रॅलीत शिंदे गटाचे नेते नाचताना दिसत होते. त्यामुळे राज्यातील महायुती नंदुरबारमध्ये सपशेल फेल झाल्याचे चित्र दिसले.
नंदुरबारमध्ये शिंदे गट व भाजपामध्ये संघर्ष असताना राज्यस्तरीय नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे का? असा प्रश्न सर्वसाधारण नंदुरबारकरांना पडला आहे. भाजपा उमेदवाराच्या उमेदवाराच्या नामांकन दाखल करणे शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे बाहेर गावी गेले होते तर त्यांनी कार्यालयातच थांबून काँग्रेसच्या रॅलीला प्रतिसाद देत दुरूनच समर्थन दिल्याचे चित्र होते.
शिंदेंच्या शिवसेनेत दोन गट
नंदुरबार जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेत दोन गट आहेत एक म्हणजे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा तर दुसरा गट आमदार आमश्या पाडवा आमच्या पाडवी यांचा आहे चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपाला विरोध तर आमश्या पाडवी हे त्यांच्या भाजपाचा प्रचार करत आहेत.
शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी घातला मशालीचा स्कार्फ
शिवसेनेतून एकनाथ शिंदे हे वेगळे झाल्यानंतर धनुष्यबाण हे चिन्ह त्यांना मिळालं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या काँग्रेसच्या रॅलीत एकनाथ शिंदे गटातील कार्यकर्ते व नेते मशाल असलेले स्कार्फ घालून फिरत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे अशी ही बनवा-बनवी असे म्हणत नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली.