खान्देश वार्ता-(धुळे)
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभेचा आमदार हा मुंबईत असतो. मग अशा आमदाराचे इथे काय काम, आमदाराचे स्थलांतर करुन पाठवून दया. निवडणूका आल्या की बाता मारायच्या आणि निवडणूक झाली की गायब व्हायचे. हे थांबले पाहिजे. अँड.के सी पाडवी यांनी मुंबईतच मतदार संघ शोधला पाहिजे. तिथे निवडणूक लढवली पाहिजे. बाप आमदार, मुलगा खासदार, ही मक्तेदारी थांबवा. महायुती असतांनाही माजी खासदाराने बंडखोरी केली आहे. त्यांनाही हद़द़पार करा. महायुतीचेच सरकार राज्यात येणार आहे. तेव्हा बंडखोरी करणाऱ्यांना हद़दपार व्हावे लागणार अहे. ही सिट निवडून आल्यास चंद्रकांत रघवूंशी यांना विधान परिषदेचे आमदार व विजयसिंग पराडके यांना महामंडळाचे अध्यक्ष करु, असा शब्द़ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडगाव वासिंयाना दिला. मी एकदा शब्द़ दिला तो शब्द़ मी फिरवत नाहीअसेही ते म्हणाले. महाविकास आघाडीला खडडयात घालणारी ही दाढी आहे. या दाढीला हलक्यात घेवू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
अक्कलकुवा तालुक्यातील धडगाव येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमश्या पाडवी यांच्या प्रचारार्थ रविवारी दुपारी आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघूवंशी, विजयसिंग पराडके, किरसिंग वसावे, ॲड राम रघूवंशी, हिराताई पाडवी आदी मान्य़वर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्हाला रस्त्यावर उतरणारे सरकार पाहिजे की फेसबूकवर चालणारे सरकार पाहिजे. आम्हाला खुप करायचे आहे. गोर गरीबांच्या जीवनात चांगले दिवस आणायचे आहेत. आदिवासी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. या गावात एमआयडीसी जाहीर करणार जेणे करुन इथल्या मतदारांना रोजगार उपलब्ध़ होईल. मतदार संघ एक नंबर आहे. मात्र विकासात शेवटचा नंबर आहे. इथल्या मतदारांनी आशिर्वाद दिले तर हा मतदार संघ विकासात एक नंबर करेल. बांबू लागवडीला सहा लाख रुपये एकरी दिले जातात. याचा लाभ घ्या, आचार संहिता संपल्यानंतर दोन रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देईल. असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
समोर कोण उभा आहे, किती पैसेवाला आहे, हे पाहू नका.या निवडणूकांमध्ये सुपडा साफ करुन टाका.आई देवमोगरा मातेच्या आशिर्वादाने धनुष्यबाणाला मतदान करा. मोलगीला तालुक्याचा दर्जा देणार,नर्मदेचे पाणी धडगावला आणण्यासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर केली. मात्र त्याला खोडा घालण्यात आला.-ज्यांनी खोडा घातला अशांनाही जागा दाखवा. विकासाचा अजंडा आम्ही पुढे नेतो आहे. रक्ताचा शेवटचा श्वास असे पर्यंत मला जनतेची सेवा करायची आहे असेही शिंदे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीला खडडयात घालणारी ही दाढी आहे. या दाढीला हलक्यात घेवू नका, असेही ते म्हणाले.धडगाव मतदार संघातील मतदार मोठया संख्येने सभेला उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांचे उशिराने आगमन झाले तरीही ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
राज्यातील हा नंबर एकचा विधानसभा मतदार संघ शिंदेच्या झोळीत टाकण्याचे आश्वासन रघूवंशी यांनी दिल्याने त्या मोबादल्यात चंद्रकांत रघूवंशी यांना विधानपरीषदेचे तिकीट देण्यात येणार तर विजयसिंग पराडके यांना महामंडळावर अध्यक्ष म्हणून घेणार असल्याचेही असल्याचा शिक्कामोर्तब करण्यात आला.