क्राईमनंदुरबार

नंदुरबार तोडफोड प्रकरणी पोलीस ऍक्शन मोडवर; १२७ समाजकंटक ताब्यात, घटनेत २५ अधिकारी व पोलीस कर्मचारी जखमी..!

खान्देश वार्ता-(धुळे)
नंदुरबार येथे आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. यादरम्यान काही असामाजिक तत्त्वांनी मोठ्या प्रमाणावर वाहनांची तोडफोड केली होती. तसेच दगडफेक करण्यात आली. यात सुमारे २५ हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सात नागरिक जखमी आहेत.

IMG 20250925 WA0054

याप्रकरणी पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून आतापर्यंत १४० जणांना ताब्यात घेतली असून पर्यंत नंतर तेरा जणांना सोडून देण्यात आले आहे. धुळे,जळगाव, नाशिकहून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जादा पोलीस कुमक मागविण्यात आली असून नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे दोन दिवसापासून नंदुरबार मध्ये ठाण मांडून आहेत.

IMG 20250925 WA0046

नंदुरबार शहरात दि.१६ सप्टेंबर रोजी दोन युवकांमधील वादातून झालेल्या हल्ल्यात जयेश वळवी हा जखमी झाला उपचारादरम्यान दि.१७ सप्टेंबर रोजी या युवकाचा मृत्यू झाला होता.या घटनेनंतर सर्व आदिवासी संघटना आणि आदिवासी समाज आक्रमक झाल्या.या खुनातील आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत या घटनेच्या निषेधार्थ तमाम आदिवासी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हास्तरीय मूक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सुमारे २० ते २२ हजार मोर्चेकरी सहभागी झाले होते. मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली होती.

IMG 20250925 WA0049

शासकीय कार्यालयात झालेल्या तोडफोड प्रकरणी दाखल गुन्हात आता पर्यत १४० हुन अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील १३ जणांची ओळख परेड नंतर त्यांचा सहभाग दिसून न आल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे.

IMG 20250925 WA0050

तर या दगडफेक आणि हल्लात २५ हुन अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी आणि ७ नागरीक जखमी झाले आहेत. मोर्च्यामधील असमाजीक तत्वांनी ही तोडफोड केली असून त्यांची ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेराद्वारे तपासणी करुन त्यांना अटक करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. तसेच या घटनेबाबात सोशल मिडीयाद्वारे लोकांना भडकणाऱयांवर देखील गुन्हे दाखल केल्या जात असून नागरीकांनी शांती राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केल्या जात आहे.

घटनेची माहिती मिळताच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे दोन दिवसापासून नंदुरबार येथे ठाण मांडून आहेत. पोलीस दलातर्फे नाशिक जळगाव व धुळे येथून अधिकचा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. नंदुरबार शहर पूर्वपदावर आले आहे. बुधवारच्या घटनेत वीस ते पंचवीस वाहनांची तोडफोड झाल्याचा अंदाज असून या प्रकरणी पंचनामा सुरू करण्यात आला आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × five =

Back to top button