खान्देश वार्ता-(धुळे)
येथील ओंकार बहुउद्देशीय विकास संस्था संचालित प्रा. रविंद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशंन्स चा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. अल्पावधितच सातत्यपूर्वक दर्जेदार आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणारी संस्था म्हणून ओळख प्रस्थापित करणारी धुळे जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था ओंकार बहुउद्देशीय विकास संस्था, गोंदुर धुळे चा स्थापना दिवस अर्थातच “21 ऑगस्ट” हा दिन संस्थेचे कर्मचारी, आजीमाजी विद्यार्थी, पालक आणि शुभचिंतक दर वर्षी मोठ्या मनोभावे साजरा करत असतात या विशेष दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जात असतात यावर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यात अनेक विद्यार्थी, संस्थेचे पदाधिकारी तसेच कर्मचारी यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून समाजाप्रती कृतर्थ भावानेतून रक्तदानाचे महान कार्य केले. या आनंदाच्या दिवसाची आठवण म्हणून परंपरे नुसार संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातील सर्व घटकांच्या जीवनात कुठेतरी आनंद पेरणी करावी या उदात्त हेतूने मतिमंद आश्रम शाळा मोराणे येथे अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला. गोशाळा येथील गाईंना चारा देण्यात आला. संस्थे अंतर्गत विविध महाविद्यालयात गेल्या सप्ताह भरात विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रदर्शन स्पर्धा, व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले यातून विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. श्री. रविंद्र ओंकार निकम आणि संस्थेच्या सचिव मा. प्रा. शुभांगी रविंद्र निकम यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली या निमित्ताने प्रा रविंद्र निकम यांनी आपल्या विशेष भाषांनातून उपस्थितांना आपल्या नेहमीच्या शैलीत मार्गदर्शन केले “प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करा रोज नित्यनियमाने ध्येयच्या दिशेने शांतपणे वाटचाल करत राहा, येणाऱ्याकाळात यश तुमचेच असेल ” असे विचार व्यक्त केले.
संस्थेच्या सचिव मा प्रा सौ ताईसाहेब शुभांगी निकम यांनी संस्थेच्या स्थापनेच्या सुरवातीच्या काळात त्यांच्या कुटुंबियांनी केलेला संघर्ष आणि आजवरच्या यशस्वी प्रवासा मागच्या अनेक भावनिक प्रसंगानां उजाळा दिला.
पुणे विद्यापीठातून फिजिक्स विषयात सुवर्ण पदक प्राप्त करत शिक्षण पूर्ण करणारे मा.प्रा. रविंद्र निकम यांनी शिक्षक म्हणून आपल्या कारकीर्द सुरुवात केली परंतू चाकोरीबद्धतेत स्वतःला सिमीत न ठेवता त्यांनी दूरदृष्टीने विचार करत ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा कोणी विचार देखील केला नव्हता अश्या थक्क करणाऱ्या वेगात एक एक यशाची शिखरे पदाक्रांत करत वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांचे महाविद्यालये सुरु करण्यात आले
त्याची सुरुवात झाली 2013 मधे पॉलिटेक्निक कॉलेज च्या स्थापने पासून त्यानंतर क्रमाने, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय डी फार्मसी, क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्न बी फार्मसी कॉलेज, यशवंतरावमुक्त विद्यापीठाचे एम सी ए, बी सी ए अभ्यास केंद्र, खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आणि या शैक्षणिक 2023-24 वर्षा पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठ संलग्न बी आणि डी फार्मसी महाविद्यालय सुरु करण्यात आले.
या विविध महाविद्यालयातून आजवर अनेक विद्यार्थी यशस्वीरित्या शिक्षण पूर्ण करून उच्च पदावर कार्यरत आहेत. या वर्षी संस्थेतील बी फार्मसी महाविद्यालयस नॅक बी ++ मानांकन प्राप्त झाले शिक्षणा सोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन संस्थेच्या वतीने वर्षभर होत असतात त्यात सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण रक्षण,विविध विषयांवर जनजागृती तसेच देशभक्तीपर कार्यक्रमांचा समावेश असतो.
संस्था आणि जवळपासच्या परिसरात आजवर 5000हुन अधिक वृक्षाचे रोपण आणि संवर्धन करण्यात आलेलं आहे. अनेक क्रीडा स्पर्धाचे आयोजन नेहमीच होत असते. अश्या हया अग्रगण्य शैक्षणिक संस्थेच्या 11व्या वर्धापन दिना निमित्त समाजाच्या सर्व स्थरातून मान्यवर, पालक, अनेक संस्था संघटनाकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा प्रा रविंद्र निकम, सचिव मा प्रा शुभांगी निकम, सदस्य श्री रोहित निकम, बी फार्मसी चे प्राचार्य डॉ अविनाश पाटील, डी फार्मसी चे प्राचार्य प्रा सागर जाधव, पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा अनंत वाघ, आय टी आय चे प्राचार्य प्रा नितेश बडगुजर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शुभचिंतक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश चौधरी यांनी केले.