निकम कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठ परीक्षेत उल्लेखनीय यश
खान्देश वार्ता-(धुळे)
कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव संलग्नता प्राप्त महाविद्यालय प्रा. रविंद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी (बी-फार्मसी) येथील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले.
अंतीम वर्ष बी फार्मसी परीक्षेत पाटील ललित बंडू याने 82.22 टक्के गुण संपादन करून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला, बोरसे सलोनी सुनिल हीने 81.10 टक्के गुण संपादन करून व्दितीय क्रमांक तसेच पाटील रश्मी रविंद्र 80.83 टक्के गुण संपादन करून महाविद्यालयातून तृतिय क्रमांक पटकावला.
तृतीय वर्ष बी फार्मसी परीक्षेत पाटील नितीन 73.99 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम, पवार पूजा 72.63 टक्के गुण मिळवून व्दितीय तसेच महाडिक रोहित याने 72.30 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय क्रमांकाने यश संपादन केले.
व्दितीय वर्ष बी फार्मसी परीक्षेत पाटील जागृती हीने 78.44 टक्के गुण संपादन करून महाविद्यालयात प्रथम क्रमांक, जाधव कावेरी हीने 77.22 टक्के गुण संपादन करून महाविद्यालयात व्दितीय क्रमांक तसेच कापडणे अभिषेक ने 76.00 टक्के गुण संपादन करून महाविद्यालयात तृतीय क्रमांक संपादीत केला.
प्रथम वर्ष बी फार्मसी परीक्षेत सोनवणे तुषार 75.7 टक्के गुण संपादन करून महाविद्यालयात प्रथम क्रमांक, विनीत मोरे याने 74.42 टक्के गुण संपादन करून महाविद्यालयात व्दितीय क्रमांक, रेलन दिशा हीने 74.34टक्के गुण संपादन करून महाविद्यालयात तृतीय क्रमांक संपादीत केला.
या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र निकम, संस्थेच्या सचिव सौ. शुभांगी निकम, प्राचार्य डॉ.अविनाश पाटील,यांच्या सह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.