क्राईमधुळे

शिरपूर प्रांत कार्यालयातील चालकसह खाजगी पंटर नाशिक एसीबी च्या जाळ्यात.!

खान्देश वार्ता-(धुळे)
महसूल विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या वाळूच्या ट्रॅक्टरवरील दंड भरून देखील ट्रॅक्टर सोडण्यासाठी २० हजारांची लाचेची मागणी करणाऱ्या शिरपूर प्रांत कार्यालयातील चालकासह खाजगी पंटरला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार यांच्या अवैध वाळू वाहतूकीचे ट्रॅक्टरवर डिसेंबर २०२३ साली महसूल विभागाने जप्त केला होता. या जप्त करण्यात आलेल्या वाळूच्या ट्रॅक्टरवर दंड आकारण्यात आला होता. सदर तक्रारदार यांनी दंड भरुन देखील ट्रॅक्टर सोडण्यास नकार देऊन २० हजारांची मागणी करण्यात आली.

IMG 20240229 071912 2

यानंतर तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला तक्रार केली. या प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची सहानिशा करुन तक्रारदाराकडे २० हजारांची मागणी करण्यात आल्याचे दिसून आले. त्यावरून नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खाजगी इसम बॉबी सनेर आणि प्रांताधिकारी कार्यालयातील शासकीय चालक मुकेश विसपुते याला ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पवार, पथकातील गणेश निंबाळकर नितीन नेटारे आदींनी केले आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 5 =

Back to top button