मनोरंजनधुळे

धुळ्यात महासंस्कृती महोत्सवात कार्यक्रमाची उधळण

खान्देश वार्ता-(धुळे)
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई जिल्हा प्रशासन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवामध्ये भरतनाट्यम, खान्देशी नृत्य, आपली मायबोली अहिराणी गीत, आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांनी गाजविला. या कार्यक्रमांना धुळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महासंस्कृती महोत्सव 5

  या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी सिमा अहिरे, मनपा उपायुक्त संगीता नांदुरकर, तहसिलदार पंकज पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व धुळेकर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महासंस्कृती महोत्सव 10

यावेळी बालन सर व सहकारी यांनी भरतांजली भरतनाट्यम नृत्य, जितु नगराळे, मुकेश तायडे, राहुल मंगळे, विकी माळीच, दिपक साळुंखे, आकाश वाघ, मयुर गुळवे, राज वाघ यांचा खान्देशी नृत्य अविष्कार, एस.व्ही.के.एम.स्कुल, धुळेच्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राची संस्कृती नृत्य, महादेव बम बम भोले.., आदिवासी ठक्कर नृत्य, वासुदेव नृत्य,  खान्देश किंग ग्रुप बजरंग बॅण्ड, शिरपूरचे आबा चौधरी, धिरज चौधरी यांचे आपली मायबोली खान्देशी अहिराणी गीते, तसेच युवा मनाचे स्पंदन टिपणारा, कविता व गीतांनी मनामनात संवाद साधणारा डॉ.सलील कुलकणी, श्री.संदीप खरे व सहकारी यांच्या “आयुष्यावर बोलू काही” या कार्यक्रमातील जरा चुकीचे, जरा बरोबर, आयुष्यावर बोलू काही ?…, अग्गोबाई, ढग्गोबाई लागली कळ.., मी हजार स्वप्नांचे.., नसतेस घरी तू जेव्हा.., दमलेल्या बाबांची कहाणी..आदी गीतांनी मैफलीत चांगलाच रंग भरला.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six + three =

Back to top button