खान्देश वार्ता-(धुळे)
वाढत्या घरफोड्या व चोरी रोखण्यात आणि गुन्ह्यांचे अन्वेषण करण्यात ढेपाळलेले पथक सपशेल अपयशी ठरले आहेत. अशातच देवपुरातील घरफोडीच्या एका गुन्ह्यात दैदीप्यमान कामगिरी बजावली गेल्याचे ऐकिवात आहे.
यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आले असून तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. संबंध नसलेल्या तीन चोरांच्या माथी ही घरफोडी मारत त्यांच्या हाती कट्टाही सोपवण्यात आल्याचे कळते. त्यासाठी तीस हजारी मनसबदारी कबूल केल्याचे समजते.
मात्र ही सर्व बनवाबनवी कारवाई दाखवण्यासाठी कुभांड असल्याने भिंग फुटण्याची शक्यता वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे. कट्टा विकत आणून ठेवायला सांगत मच्छूने सूर मारला खरा पण पाणी कमी असल्याने ठाक लागला व डोके खडकाला ठोकले गेले आहे. आता मोठे साहेब घरातील गुन्ह्याचे काय अन्वेषण करतात याकडे दलाचे आणि जिल्ह्याचे व चोरांचे लक्ष लागून आहे.