
खान्देश वार्ता-(धुळे)
स्व.मोहंमद रफी यांची पुण्यतिथी व किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त धुळयातील राजर्षी शाहू नाट्य मंदिरात नुकताच रुपेंद्र तावडे प्रस्तुत स्वरमोहिनी कराओके गृपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यादगार लम्हे या कार्यक्रमात हिंदी गीतांची अविट मैफल सादर करण्यात आली. यावेळी रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ते समारोप पर्यंत मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील किंगमेकर म्हणून ओळख असलेले स्व.मोहंमद रफी व किशोरकुमार यांचे 25 हून अधिक गाणे नवनिवेदित कलाकारांनी सादर केले. या वेळी अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे ‘वन्स मोअर’ ही दिला.
गेल्या तीस वर्षापासून संगीत क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे रुपेंद्र तावडे यांनी शहरातील संगीत प्रेमीसाठी स्वरमोहिनी कराओके क्लासची सुरुवात करुन शहरासह परिसरातील अनेक संगीत प्रेमींना कलासच्या माध्यमातून संगीतातील सुर, ताल व लय याचे अभ्यासपुर्वक शिक्षण देत नवनिवेदित कलाकारांना मराठी, हिंदी गाणे म्हणण्यासाठी एक चांगला प्लेटफार्म स्वरमोहिनी गृपच्या माध्यमातून तयार करुन दिला आहे. या ठिकाणी 25 वर्षापासून ते 75 वर्षवयांपर्यतचे संगीत प्रेमी गाणे शिकण्यासाठी दाखल होतात. आणि अवघ्या दोन महिन्यातच त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर स्टेज शो मध्ये आपली कला साकारण्याची संधी मिळते.
असाच “यादगार लम्हे” स्व.मोहंमद रफी यांची पुण्यतिथी व किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेऊन नवनिवेदित कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. दरम्यान या कार्यक्रमावेळी एक हजारांहून अधिक संगीत प्रेमींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बदन मे सितारे, अपनी तो जैसे वैसे, प्यार हमारा अमर रहेगा, एक प्यार का नगमा है, मच गया शोर सारी नगरी रे यासह 25 हून अधिक गाणे नवनिवेदित कलाकारांनी यावेळी सादर केली.
विशेष म्हणजे या हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमांमध्ये तीन वर्षाची कु. ओवी हिने “एक प्यार का नगमा है” हे हिंदी गीत सादर करून रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे या कार्यक्रमात रसिक प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. यामुळे 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनी स्वरमोहिनी कराओके गृपच्या वतीने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार असल्याचे स्वरमोहिनी गृपचे संस्थापक अध्यक्ष रुपेंद्र तावडे यांनी माहिती दिली आहे.