झोपेचे सोंग घेतलेल्या Dhule मनपाला जागे करण्यासाठी आयुक्तांच्या दालनात आणले मोकाट कुत्रे

खान्देश वार्ता-(धुळे)
शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. दोन महिन्यांपूर्वी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका चिमुडीचा बळी गेला होता. या घटनेनंतर अनेक राजकीय पक्षांनी आवाज उठविला. तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रभादेवी परदेशी यांनी मनपाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र लवकरच श्वान निर्जीबीकरण सुरू होईल अशी लेखी हमी मनपाने दिली होती.
परंतु मनपा वेळ काढू पणा करत असल्याने शुक्रवारी झोपेचे सोंग घेतलेल्या मनपाला जागे करण्यासाठी श्रीमती परदेशी यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात चक्क श्वान नेले. या अनपेक्षित आंदोलनामुळे मनपा प्रशासनाची चांगलीच प्रारंभ उडाली. धुळे शहराची मोकाट कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी प्रभादेवी परदेशी यांनी १ मे रोजी मनपाला पत्र दिले होते. त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही त्यानंतर पुन्हा १० जून रोजी याच समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले. दिवसाला ६० ते ६५ जणांना श्वानदंश होत असल्याने तात्काळ कुत्र्यांची नसबंदी करण्याची मागणी करण्यात आली होती.
अन्यथा मनपाला टाळे ठोकू हा इशाराही श्रीमती परदेशी यांनी दिला होता. त्यानंतर दास्तावलेल्या मनपाने १२ जून रोजी पत्र देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. शिवाय ७ जुलै रोजी आचारसंहिता शिथील झाल्यानंतर मोकाट कुत्र्यांचे निर्भीजीकरण केले जाईल असे लेखी पत्र ही मनपाने दिले होते. मात्र जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटूनही मनपाकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.
शहरातील देवपूर परिसरातील बोरसे नगरात मजूर कुटुंबातील खुशी तेजाब रहासे या एक वर्षीय बालिकेला श्वानाने लचके तोडून ठार केले होते. त्या मृत्यूला सरोशी मनपा जबाबदार असल्याने मृत बालिकेच्या परिवाराला मनपाने २५ लाखांची भरपाई देण्याची मागणी यावेळी आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी बालिकेचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.
मोकाट कुत्र्यांबाबत मनपाला विचारणा केली असता नेहमी म्हणे का गांधी यांचे नावाचे तुंनतुने वाजवले जातात. त्यामुळे प्रभादेवी परदेशी यांनी मनेका गांधी यांचे पोस्टरच सोबत आणले होते. मयत बालिकेच्या आजीने देखील मनेका गांधी यांचे पोस्टर आयुक्तांसमोर जळकाविले जेणेकरून इतर बालके तरी कुत्र्यांपासून सुरक्षित राहतील. यावेळी प्रभाव परदेशी यांनी आणलेल्या श्वानाच्या गळ्यातील फलकांनी लक्ष वेधून घेतले होते.