खान्देश वार्ता-(धुळे)
धुळे शहरातील श्री विघ्नहर्ता सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल येथे सिद्धी ज्योत आय आणि रेटिना सेंटरचे रविवारी सकाळी उद्घाटन झाले. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.रवी वानखेडकर यांनी फित कापून डोळे तपासणी व रेटिना सेंटरचे उद्घाटन केले.
याप्रसंगी रेटिना सर्जन डॉ. किशोर सातपुते, डॉ. दीप्ती काळे, डॉ. प्रियंका अग्रवाल व श्री विघ्नहर्ता सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. यतीन वाघ, डॉ. पुनीत पाटील, डॉ. मनोज पटेल, डॉ. तुकाराम पाटील, डॉ. कपिल पाटील, डॉ. विकास राजपूत, डॉ. मुकेश सूर्यवंशी, डॉ. जितेंद्र चौधरी, डॉ. पल्लवी राजपूत, डॉ. प्रफुल्ल जाधव, डॉ. प्रथमेश मोरे, डॉ. हुझेपा मिर्झा, डॉ. हेमकांत पाटील, डॉ. प्रीती पटेल, डॉ. राजश्री जाधव, डॉ. प्रियदर्शनी सूर्यवंशी, डॉ स्मिता वाघ, डॉ. श्रद्धा पाटील यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. वानखेडकर यांनी बोलताना सांगितले, श्री विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये निरनिराळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे रुग्णांना नाशिक, मुंबई, पुणे जाण्याची आवश्यकता नाही. याठिकाणी सुपरस्पेशलिटी डॉक्टर असल्यामुळे एका छताखाली सर्व सुविधा उपलब्ध आहेत. हे धुळे शहराचे मोठे भाग्य आहे. पूर्णवेळ रुग्णांना सुविधा देण्यासाठी एकमेव विघ्नहर्ता हॉस्पिटल हे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव अत्याधुनिक हॉस्पिटल आहे.
मात्र डोळ्यांची शस्त्रक्रिया देखील या ठिकाणी व्हावी असा मानस येथील डॉक्टरांचा होता. त्यामुळे आज ती सुविधा देखील याठिकाणी उपलब्ध झाल्याने आता डोळ्याच्या विविध शस्त्रक्रियासाठी. मुंबई पुणे जाण्याची आवश्यकता नाही. याच ठिकाणी सुप्रसिद्ध डॉ. किशोर सातपुते व त्यांचे सहकारी 24 तास रुग्णांना सेवा देण्यासाठी तत्पर आहेत. यामुळे धुळे शहरासह जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ.रवी वानखेडकर यांनी केले.