खान्देश वार्ता-(धुळे)
उपविभागीय पोलिस अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी आयपीएस एस.ऋषिकेश रेड्डी हे अतिशय प्रामाणिक, ईमानदार, कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. कोणत्याही गोष्टीत ते अर्थपूर्ण व्यवहार करीत नाही, अशी त्यांची सर्वदूर ख्याती पसरली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ते डोळ्यात तेल घालून असतात. त्यांच्या कार्यशैलीची चुणूक त्यांनी अल्पावधीत दाखवून दिली आहे. अवैध व्यवसायिकांवर त्यामुळे बऱ्यापैकी जरब बसलेली आहे.
मात्र, त्यांच्या त्यांच्याच अधिपत्त्याखाली काम पाहणारा अधिकारी व एक कर्मचारी हे त्यांच्या नावाने अवैध व्यवसायिकांकडून हप्ता वसुली करीत असल्याचे कळते. हा प्रकार म्हणजे कर्तव्यदक्ष अधिकारी रेड्डी यांच्या ईमानदारीला काळीमाच फासण्याचा प्रकार आहे. त्यांच्या नावाने लूट करत अवैध व्यवसायिकांना अभय दिले जात असल्याने समाजात चुकीचा मॅसेज जात असून अप्रत्यक्षपणे रेड्डीच्या लौकीकाला डागळण्याचाच हा प्रकार आहे.
अधिकारी रेड्डींची पेालिस दलात सुरूवात असून सुरूवातीलाच नाट लावण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे आपल्याच झारीतील हे शुक्राचार्य कोण आहेत, याचा शोध घेऊन त्यांचा पुरता बंदोबस्त करावा, अशी मागणी सुज्ञ, जागरूक व जागृत धुळेकरांमधून होत आहे.
हे वसुलीभाई अधिकारी रेड्डींच्या नावाने हप्ता वसुलीसह काय काय प्रकार करत असतील हा संशयाचा आणि संशोधनाचा विषय ठरतो. चांगले अधिकारी टिकू द्यायचे नाहीत, त्यांची प्रतिमा ऐनतेन प्रकारे मलिन करायची हा धुळ्यातील प्रघात आहे. यामुळे अधिकारी रेड्डींनी वेळीच सावध होत या वसुलीभाईंना ठिकाणावर आणण्याची आवश्यकता आहे. असा सूर धुळ्यातील अधिकारी रेड्डीप्रेमींमधून आवळण्यात येत आहे.
तूर्तास एवढेच..!