खान्देश वार्ता-(धुळे)
पोलिस दलाकडे आपातकालिन परिस्थिती 112 क्रमांक डायल केल्यानंतर एखादया व्यकतीने फोनवरुन पोलीसांची मदत मागितल्यास पोलीस नियंत्रण कक्षाकडून त्यास प्रतिसाद दिला जातो. तक्रारदार संबंधित व्यक्तीचे लोकेशन तपासून तो फोनचा मेसेज तात्काळ नियंत्रण कक्षातून तक्रारदाराच्या हददीतील पोलीस ठाण्याला कळवून पोलीस अधिकारी व कर्मचारी 112 क्रमांकाची पोलीस गाडी घेऊन तक्रार निवारण्यासाठी घटनास्थळी दाखल होतात. यासाठी काही कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
मात्र धुळे जिल्हा पोलीस दलातील धुळे शहर पोलीस ठाणे, धुळे तालुका, दोंडाईचा व निजामपूर या चारही पोलीस ठाण्यातील डायल 112 ही यंत्रणा वेळेवर घटनास्थळी न पोहोचल्याने फोल ठरली आहे. याची दखल घेत जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी चारही पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारींची तडकाफडकी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात पुढील आदेश येईपर्यत बदलीचे आदेश काढले आहेत. तर धुळे शहर व निजामपूर पोलीस ठाण्यातील तीन कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
धुळे जिल्हा पोलीस दलातील नियंत्रण कक्षात गुरुवारी सकाळी 112 क्रमांकवर धुळे शहर, धुळे तालुका, दोंडाईचा, निजामपुर या पोलीस ठाण्याच्या हददीत तक्रार निवारण करण्यासाठी वायरलेस झाल्यावर मर्यादित कालावधीत चारही पोलीस ठाण्यातील 112 सेवेसाठी कार्यरत पोलीस कर्मचारी वेळेवर घटनास्थळी पोहोचले नाहीत. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.धिवरे यांना माहिती प्राप्त झाली. याची दखल घेत पोलीस अधिक्षक श्री. धिवरे यांनी धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन, तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, निजामपूर पोलीस उपनिरीक्षक हनुमंतराव गायकवाड, दोंडाईचा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली आहे. तर धुळे शहर पोलिस ठाण्याचे हिंमाशू ठाकूर अणि निजामपूर पोलीस ठाण्याचे कृष्णा भील व सुनील अहिरे यांना निलंबित करण्यात आले आहे.
नागरिकांनी डायल 112 वर कॉल केल्यानंतर तात्काळ मदतीसाठी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना होतात. मात्र वेळेत प्रतिसाद न दिल्याने कर्तव्यात कसूर केली म्हणून पोलीस अधिक्षकांनी चार अधिकारींची कंट्रोल जमा करण्यात आले. वारंवार मार्गदर्शन व सुचना देऊनही कामकाजात सुधारणा न झाली नाही. शिस्त लागावी यासाठी करवाई करण्यात आली आहे.
-किशोर काळे, (अपर पोलिस अधिक्षक, धुळे.)