क्राईमधुळे

Dhule News |धुळ्यात भाजपच्या माजी नगरसेवक पत्नीची आत्महत्या

खान्देश वार्ता-(धुळे)
शहरातील जुने धुळ्यातील रहिवासी असलेल्या विवाहितेने तापी नदीत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नरडाणा परिसरातील सावळदे पुलावर एक सुझूकी एक्सेस ही दुचाकी उभी असल्याचे दिसून आले. यावरुन कोणीतरी तापी नदीत उडीत घेतल्याचा स्थानिकांना संशय आला. स्थानिक नागरिकांनी नदीपात्रात शोध घेत असला असता एका महिलेचा मृतदेह आढळून आला. यावेळी काही मच्छिमारांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला.

याबाबत नरडाणा पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात नरडाणा येथील रुग्णालयात नेला. त्यानंतर हिरे रुग्णालयात    शवविच्छेदनासाठी आणला जाणार होता. श्रेया देवेंद्र सोनार (रा.जुने धुळे) असे या मृत महिलेचे नाव आहे. त्या भाजपचे माजी नगरसेवक देवेंद्र सोनार यांच्या पत्नी आहेत. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने भाजपच्या पदाधिकार्‍यांनी घटनास्थळावर व त्यानंतर रुग्णालयात धाव घेतली होती. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten − 5 =

Back to top button