अन्य घडामोडीजळगाव

चोपडा वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांच्याहस्ते शासकीय कार्यालय व शाळेतील विद्यार्थ्यांना पक्ष्यांना पाणी मिळावे याकरिता ट्रे वाटप

खान्देश वार्ता-(चोपडा प्रतिनिधी)
जमीर शेख (भा.व.से) (उपवसंरक्षक,यावल वन विभाग,जळगाव) प्रथमेश हाडपे (साहाय्यक वनसंरक्षक चोपडा) यांचा मार्गदर्शनाखाली “आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सत्रासेनं” या ठिकाणी वन वणवा,वन्यजीव संरक्षण,अवैध डिंक व झाडांच होत असलेलं नुकसानी तसेच पक्षी संवर्धन या विषयावर विद्यार्थी व शिक्षकांसाठी जनजागृती कार्यशाळा चोपडा रेंज मार्फत आयोजित करण्यात आली होती. यावेळी अजिंक्य भांबुरकर(संचालक, वाईल्ड ल्यॅंड्स कंझर्वेशन फाऊंडेशन,नागपूर) यांनी वन वणवा कसा लागतो व तो मानव का लावतो, त्याचे निसर्ग व मानवा वर होणारे दुष्परिणाम व विद्यार्थांनी त्यांच्या मार्फत त्यांच्या घरच्यांना, नातेवाईकांना, परिसरातील लोकांना जनजागृती करून वन विभाला मदत होईल असा सल्ला देण्यात आला.

त्याचप्रमाणे पक्षी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किती महत्त्वाची भूमिका करतात व त्यांच्या माध्यमातून जंगलाची वाढ कशी होते हे सांगण्यात आले. बी.के.थोरात (व.प.अ,चोपडा रेंज) यांनी वन वणवा, तसेच डिंक संकलन करताना कोणीही धावडा व सलई झाडांना इंजेक्शन देऊ नये असा सल्ला दिला व त्याचे दुशपरिणम पण सांगितले. सर्वात प्रथम तर इंजेक्शन दिल्याने ते झाड जास्तीत जास्त २ वर्ष जगत तसेच इंजेक्शन दिलेल्या झाडातून मिळालेल्या डिंकातून मानवी शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे झाडांना इंजेक्शन देऊ नये असा सल्ला देण्यात आला.

जमीर शेख(भा.व.से)(उपवसंरक्षक,यावल वन विभाग,जळगाव)व प्रथमेश हाडपे(साहाय्यक वनसंरक्षक चोपडा)यांच्या संकल्पनेतून पक्ष्यांना उन्हाळ्यात पाणी मिळावे याकरीता बी.के.थोरात(व.प.अ,चोपडा रेंज) यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना व चोपडा तालुक्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मातीचे लहान ट्रे वाटप करण्यात आले. तहसील कार्यालयाल चोपडा येथे जाऊन सचिन बाबळे नायब तहसीलदार चोपडा व तलाठी, पंचायत समिती चोपडा येथील रमेश वाघ,गटविकास अधिकारी पंचायत समिती चोपडा व कर्मचारी,चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी,भगिनी मंडळ संचलित महिला मंडळ माध्यमिक विद्यालय चोपडा येथे जाऊन विध्यार्थी व शिक्षक वर्ग यांना पक्ष्यांना पाणी मिळाव तसेच शिक्षक व विद्यार्थी यांना पक्षी संवर्धन या विषयावर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमात परिमंडळ सत्रासेन वनपाल आर.एस.मोरे, वनरक्षक एस.के.कणखरे, वनरक्षक एस.पी.भालेराव, वनरक्षक आर.डी.भालेराव, वनरक्षक आर.एस.पावरा व उपस्थित वनकर्मचारी व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − eleven =

Back to top button