क्राईमधुळे

शिक्षकांकडून पैसे उकळणाऱ्या लाचखोर मुख्याध्यापकाला धुळे एसीबी ने घेतले ताब्यात

Dhule ACB- खान्देश वार्ता-(धुळे)
धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील सोशल अँड कल्चरल असोसिएशन संचलित आदर्श हायस्कूलच्या मुख्याध्यापकाला एक हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला रंगेहाथ पकडून अटक केली आहे.

आदर्श हायस्कूल या ठिकाणी उपशिक्षिका पदावर कार्यरत असलेल्या तक्रारदार महिलेकडे शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमासाठी खर्च झाल्याच निमित्त करून शाळेतील सर्व कार्यरत शिक्षक यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपये आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी आठशे रुपये जमा करण्यासाठी बैठक घेतली होती.

दरम्यान मुख्याध्यापकाच्या या निर्णयाचा तक्रारदार विरोध दर्शवला यामुळे आरोपी मुख्याध्यापक प्रदीप परदेशी याने तक्रारदार शिक्षिकेला पैसे दिल्याशिवाय हजेरी रजिस्टरवर सही करण्यास नकार दिला. यामुळे मुख्याध्यापकाने आपल्याकडे एक हजार रुपयाची लाच मागितली असल्याची तक्रार संबंधित महिला शिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

IMG 20240319 WA0020

दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारावर सापळा रचत आदर्श विद्यालयामधील मुख्याध्यापक कक्षामध्ये लाच स्वीकारत असताना मुख्याध्यापक परदेशी याला रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी मुख्याध्यापक प्रदीप परदेशी याच्यावर धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक मनजीत सिंह चव्हाण, पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे यांच्यासह पथकाने केली आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen + seven =

Back to top button