अन्य घडामोडीधुळे

मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचे कारस्थान- मा.आ.अनिल गोटे

(खान्देश वार्ता)-धुळे
मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठीच लाठी हल्ल्याचे कारस्थान करण्यात आल्याचा आरोप करीत हुकूमशहाला खुश करण्यासाठीच लाठी हल्ला झाला, असा आरोप लोकसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकातून केला आहे. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी समाजाने लाखोंचे मोर्चे काढले पण कुठे घट्ट झाले नाही. मराठा समाजाचे पाईक लक्षावधीच्या संख्येने एकत्र आले. देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री होते. पण कुठलेही कुठेही गालबोट लागले नाही.

मराठा समाजाच्या या संयमी व शांततापूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना अविश्वसनीय व कपलकल्पित आहे. जातीच्या आधारावर आरक्षण देण्यावर मूलतः विश्वास नसलेल्या व विरोध असलेल्या विचारांवर भाजपाची मातृसंस्था आरएसएस चा देशव्यापी डोलारा उभा आहे. मतांच्या लालसे पोटी भाजपा जातीय आधारावरील आरक्षणास पाठिंबा देते.

आपल्या पाच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडात शेकडो वेळा कबूल करूनही देवेंद्र फडणवीस यांनी धनगरान सकट कुणालाही आरक्षण दिले नाही. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेने दिलेला धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल विधिमंडळात चर्चेला येऊ दिला नाही.

पण त्याचवेळी मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपली मते सुरक्षित करून घेतली. धनगरांना गाजराच्या शेतात सोडून दिले, असा आरोप ही आ.गोटे यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोन मराठा समाजाचे दिग्गज नेते असताना पोलीस एवढ्या अमानुष लाठी हल्ला करूच कसे शकतात.? आपल्या कपटी व कारस्थानी मनोवृत्तीचे देवेंद्र फडणवीस यांनी न बोलता नेमके दर्शन घडवून दिले. एक फडणवीस दोन मराठ्यांना भारी पडले एवढे निश्चित. असेही मा.आ.गोटे यांनी पत्रकातून म्हटले आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + seventeen =

Back to top button