अन्य घडामोडीधुळे

काँग्रेसला धुळे-मालेगाव मधून उमेदवार मिळू नये, हा निष्ठावंतांचा अवमान- मा.आ.अनिल गोटे

खान्देश वार्ता-(धुळे)
निष्क्रिय खासदारांविरुद्ध लढण्यासाठी कुणीही स्वतःचा पक्षाचा राजीनामा देण्याचे आवश्यकता नाही. देशातील सर्वात जुन्या काँग्रेस पक्षाला धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवार मिळू नये, हा निष्ठावंत स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा अवमान आहे. मतदार संघाबाहेरील उमेदवार दिल्यामुळे हा प्रचंड असंतोष आहे. असे लोकसंग्रामचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

गोटे यांनी पुढे म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाने अत्यंत निष्क्रिय खासदार डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील मतदारांवर लादले आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे म्हणून दोन वेळा व राम मंदिराच्या प्रश्नावर १९८९ पासून मतदान करीत आहेत. यामुळेच की काय दगडाला शेंदूर फासला, तरी लोक निवडून देतील असे भाजपाने गृहीत धरूनच तोच उमेदवार दिला.

आपण दगड उभा केला तरी मोदींच्या व राम मंदिराच्या प्रश्नांवर निवडून येईल भाजपाच्या या आत्मविश्वासाला धुळे मालेगाव मतदार संघातील मतदार दणका देण्यासाठी भाजपामधील असंतुष्टांसह अन्य सर्वच पक्षाच्या नेत्यांची गुरुवारी मालेगाव येथे झालेल्या बैठकीत ठरले. काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवार शोभा बच्छाव वास्तव्यास नाशिकवासी आहेत. नाशिकच्या महापौर होत्या. विधानसभेतही नाशिक जिल्ह्यातूनच निवडून आल्या होत्या. एवढेच नव्हे तर त्यांचे स्वतःचे मतदान धुळे मालेगाव लोकसभा मतदार संघात नाही. त्या स्वतःलाही मतदान करू शकत नाही. असा उमेदवार चालूच शकत नाही. असे स्पष्ट मत उपस्थितांपैकी बहुतेकांनी व्यक्त केले.

धुळे मालेगाव मतदार संघातून निवडून नवीन खासदारांचे देशाच्या नव्या पंतप्रधानांना दिलेले मत अत्यंत बहुमोल असेल. आपण करीत असलेली एकजूट ही केवळ निष्क्रिय खासदार डॉ. सुभाष भामरे विरुद्ध निर्माण झालेल्या असंतोषांचे दर्शन घडवण्यासाठीच आहे. यासाठी आपण एकत्र येत आहोत. काही पक्षातील जबाबदार नेत्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. पण आपली सर्वच पक्षाच्या उपस्थित कार्यकर्त्यांना अत्यंत आग्रहाची विनंती आहे की, या एका उद्देशासाठी कुणीही आपल्या मूळ पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची अजिबात आवश्यकता नाही.

आपण आपल्या पक्षातच राहून हे पवित्र कार्य करू शकतो. उगाचच तुमचा पक्ष सोडून नका. आपण आहात त्याच ठिकाणी पक्के राहा. आपला संताप मर्यादित आहे की, निष्क्रिय उमेदवारासाठी मते मागायची कशाच्या विश्वासावर मागील दहा वर्षात खासदारांनी त्यांनी एकही काम केलेले नाही. तुम्ही धुळे महापालिकेची अक्षरशा वाट लावली. धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही धुळे शहरात १७३ व १३६ कोटी असे ३०९ कोटी रुपये खर्ची टाकून आजही आठवडा आठवडा पाणी येत नाही. रमजान महिन्यासारख्या पवित्र उपवासाच्या कालखंडात मुस्लिम बांधवांच्या वस्त्यांमध्ये चार चार दिवस पाणी आले नाही. रोजगार मिळावा यासाठी दहा वर्षात एकही नवा उद्योग आणला नाही. टेक्स्टाईल पार्क कुठे आहे? झोडगा मालेगाव एमआयडीसी चे काय झाले. मनमाड इंदोर रेल्वेमार्ग होऊ नये असेच प्रयत्न केले. तुमचे यावर एकमत असेल तर आपण आपला पक्ष सोडू नका असे आवाहन ही अनिल गोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − eighteen =

Back to top button