क्राईमधुळे

धुळे अवधान टोलवर पारदर्शकतेचा संपूर्ण अभाव, हिशेबाचे गोलमाल..!

अवजड मालवाहू वाहन आणि वाळूमाफियांना वारकऱ्यांप्रमाणे टोलमाफी..!

खान्देश वार्ता-(धुळे)
ज्या रस्त्यांवर टोल लादला जातो, त्या रस्त्यांची बांधणी आणि त्यानंतरची देखभाल देखील कंत्राटदाराने करावी अशा एका चांगल्या हेतूने टोलची संकल्पना उचित असली, तरी या संकल्पनेचा प्रत्यक्ष व्यवहाराशी मात्र फारसा संबंध राहिला नाही. टोल कंत्राटदार आणि सरकारी यंत्रणांच्या हातमिळवणीचा वास धुळे शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान नाक्यावर दरवळू लागला आहे.

टोलवसुलीच्या व्यवहारावर संशयाच्या लाल रेघोटय़ा ओढल्या जात आहेत. वारकऱ्यांप्रमाणे अवजड मालवाहू वाहन व वाळूमाफियांच्या अवजड वाहनांना टोलमाफीचा लाभ येथे सुरूवातीपासून दिला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून झोल सुरु आहे. एनएचएआईने आयएसटीपीएल ला ठेका चालवण्यास दिला आहे. आयएसटीपीएलने तो एनपीएस या कंपनीला दिला आहे. एनपीएसमध्ये १४० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. ऑपरेशन व पेट्रोलिंग असे दोन भाग आहेत. ऑपरेशन विभागातील कर्मचारी टोल बुथवर वसुलीचे काम पाहतात. येथील कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याबाबतही तक्रार आहे. याचा देखील उलगडा आम्ही लवकरच करणार आहोत.

mandal toll plaza kikakui road surat toll booth dealers 1lidbobust

सिस्टीमध्ये छेडछाड…
एनपीएस कंपनी व्यवस्थापनाने मालामाल होण्यासाठी टोलच्या सिस्टीमध्येच बदल केल्याचे सांगितले जाते. २० किमी पुढील अवजड मालवाहू वाहनांना स्थानिक वाहन दाखवून त्यांना सोडले जाते. शिरपूर, शिंदखेडा, जळगाव, चोंडी, एरंडोल यासह इतर ठिकाणांहून टोलवर येणारी वाहने देखील स्थानिक वाहन दाखवून सोडली जातात. अशा प्रकारे महिन्याकाठी मोठा झोल करण्यात येत असल्याचे सांगितले जाते. अवजड मालवाहू वाहन व वाळूसह इतर माफियांकडून प्रतिवाहनासाठी महिन्याची विशीष्ट रक्कम ठरवण्यात आल्याचे कळते. यात थेट आयएसटीपीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील आर्थिक लाभ दिला जात असल्याचे कळते.

टोल वरील जबाबदार काय म्हणतात…
आयएसटीपीएलचे सीईओ श्रीनिवास यांनी ‘मुझे कुछ पता नहीं है, हमने टोल का एनपीएस कंपनी को कॉन्ट्रक्ट दिया है. एैसा कुछ होता है, तो कारवाई करेंगे’ असे म्हटले. एनपीएसचे व्यवस्थापक राकेश खैमनार यांनी ही चुकीची माहिती असल्याचा दावा केला आहे. असा कोणताही प्रकार होत नसल्याचे सांगितले आहे.

अशी सुटतात वाहने…..
वाहन चालक टोल बुथवरील कर्मचाऱ्याला आपल्या मालकाचे नाव सांगतो. तो कर्मचारी त्यांच्या कार्यलयात संपर्क करुन माहिती देतो आणि वाहन सोडले जाते.

केंद्रीय मंत्री गडकरींना काय देणार..?
फ्री मध्ये सोडल्या जाणाऱ्या वाहनांचे क्रमांक आणि मालकांच्या नावांसहीतची यादी. वाहने सोडण्यासाठी होत असलेला चालक व बूथ कर्मचारी यांच्यातील संवाद चित्रीकरणासहीत. कर्मचाऱ्यांची होत असलेली आर्थिक पिळवणूक याबाबतची वस्तुनिष्ठ व सविस्तर माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लवकरच सोपवली जाणार आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × three =

Back to top button