क्राईमधुळे

धुळ्यात लाचखोर महिला वेतन अधीक्षिका एसीबीच्या ताब्यात

खान्देश वार्ता-(धुळे)
तकारदार व त्यांची पत्नी धुळे महानगरपालिका हायस्कुल येथे विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट शासनाच्या शालेय शिक्षण व किडा विभागाच्या शासन निर्णयान्वये त्यांचे एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीतील थकीत वेतन तसेच ७ व्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मंजुर होवुन मा. शिक्षण संचालक, पुणे यांनी सदरचे थकीत वेतन अधिक्षक (माध्यमिक), वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, धुळे यांच्या खात्यात जमा केले होते.

परंतु सदरचे थकीत वेतन तक्रारदार व त्यांच्या पत्नीस अदा न झाल्याने त्यांनी वेळोवेळी श्रीमती मिनाक्षी गिरी, अधिक्षका (माध्यमिक), वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, धुळे यांची त्यांच्या कार्यालयात जावुन भेट घेतली होती. परंतु त्यांनी निरनिराळे कारणे दाखवत तक्रारदार व त्यांच्या पत्नीस त्यांचे थकीत वेतन अदा केले नाही.

त्यांनतर सुमारे १५ ते २० दिवसापुर्वी तक्रारदार यांनी श्रीमती मिनाक्षी गिरी, अधिक्षीका यांची त्यांचे कार्यालयात जावुन त्यांना सदरचे थकीत वेतन अदा करणेबाबत विनंती केली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, धुळे दिली होती.

सदर तक्रारीची बुधवार दि.२० रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान अधिक्षीका श्रीमती मिनाक्षी गिरी यांनी तक्रारदार यांचेकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केल्याने त्यांचेवर सापळा लावला असता सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − six =

Back to top button