क्राईमजळगाव

चोपडा तालुक्यात अवैधरित्या लाकूड वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

खान्देश वार्ता-(चोपडा)
मोहरला ते कोरपावली रस्त्याने वाहनचालक खलील रफिक तडवी (रा.कोरपावली) हा अवैधरित्या लाकूड वाहतूक करत असताना वनविभागाच्या पथकाने सदर इसमा विरुध्द वन अपराध अन्वये वनगुन्हा नोंदविला आहे. अशी माहिती सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे, चोपडा यावल वनविभाग, जळगांव यांनी दिली आहे.

IMG 20240319 WA0000

उपवनसंरक्षक, यावल वनविभाग जळगाव यांच्यकडून मिळालेल्या गुप्त बातमी वरून मोहरला ते कोरपावली रस्त्याने वनपथक दबा धरुन् बसले असताना एका ट्रॅक्टरमध्ये अंजन, निम इमारतीचे अवैधरित्या लाकूड वाहतूक करतअसल्याचे निदर्शनास आले.

वाहनचालकाकडे लाकूड वाहतूक परवाना नसल्याने वन गुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन शासकीय आगार यावल येथे जमा केले.

पुढील कार्यवाही जखीर एम शेख, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, प्रथमेश वि. हाडपे, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल भिलावे, वनक्षेत्रपाल यावल पुर्व स्वप्नील फटांगरे यांनी व त्यांचे अधिनस्थ स्टाफ हे करीत आहेत.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six + fourteen =

Back to top button