धुळेशैक्षणिक

धुळ्यातील शशिकांत येवले यांना ज्योतीशास्त्रात पीएचडी पदवी प्रदान

खान्देश वार्ता-(धुळे)
शहरातील दत्तमंदिर परिसरात वास्तव्यास असलेले शशिकांत येवले हे निष्णात ज्योतीषशास्त्रात पारंगत आहेत. नुकतीच त्यांना ज्योतीष वेद वेदांग लोकमान्य वराह मिहीर ज्योतीष मुक्त विद्यापिठाच्या वतीने ज्योर्तीविद्या वाचस्पती ही मानाची पदवी प्रदान करुन नंदकिशोर जकातदार, कुलगुरु आनंदकुमार कुलकर्णी, अँड..मालती शर्मा यांच्या हस्ते गौरवण्यात आले.या पुर्वी त्यांना २०२० मध्ये होरा भुषण ही पदवी बहाल करण्यात आली आहे.

IMG 20241129 WA0008

शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक म्हणुन ३८ वर्ष सेवा केल्या नंतर २०१५ मध्ये शशिकांत येवले हे निवृत्त झाले.१९९० पासुन त्यांचा ज्योतीषशास्त्र विषयात अभ्यास सुरु होता.त्यांनी महाराष्ट्र ज्योतीष परिषद मुंबई यांच्या कडून ज्योतीष विशारद,प्रविण, पंडीत,शास्त्री या विषयांचा अभ्यास पुर्ण केला.

तसेच सुनिल गोंधळेकर ठाणे यांच्याकडे नक्षत्रम,प्रविण नक्षत्र भास्कर,नक्षक्ष भुषण,नक्षत्र शिरोमणी व नक्षत्र अलंकार पदवी संपादीत करत कृष्णमुर्ती ज्योतीष पध्दतीचा अभ्यास पुर्ण केला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाची योग शिक्षकाचा अभ्यासक्रम देखील २०२० मध्ये त्यांनी पुर्ण केला. योग प्राणा विद्या, रेकी, हिलींग चा देखील त्यांनी अभ्यास पुर्ण केला. कवी कुलगुरु कालीदास संस्कृत विद्यापिठा कडून पदवी,पदवीत्तर पदवी संपादीत केली आहे. इंटरनॅशनल अस्ट्रॉलॉजी फेडरेशन इन अमेरीका रिसर्च ऑर्गनाझेशनची त्यांना लाईफ टाईम मेंमबरशीप मिळाली आहे.

IMG 20241129 WA0008त्यांच्या प्रबंधावर त्यांना इंडो थालयंड ज्योतीष अवार्ड,पुरोहित अवार्ड,महर्षी अगस्ती अवार्ड,थाई श्री बुध्द महर्षी अवार्ड देण्यात आले आहेत.नुकतीच कवी कुलगुरु कालीदास संस्कृत विश्वविद्यालयाची वास्तुशास्त्र विशारद पदवी संपादीत केली आहे. हस्तरेखा शास्त्रातील निपुणतेसाठी सामुद्रीक पंडीत व सामुद्रीक शास्त्री अवार्ड देण्यात आले आहेत.तसेच त्यांचा अंकशास्त्र, कवडीशास्त्र, लालकिताब, जेमीनी ज्योतीष, मुद्राशास्त्र, मंत्रशास्त्र, कथाकार, भागवत,देवीभागवत,रामकथा यांचा भागवत विद्यापिठ पुणे येथे अभ्यास पुर्ण झाला आहे.त्यांना आता पर्यंत विविध सामाजीक संस्था कडून विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 − 12 =

Back to top button