क्राईमनंदुरबार

न्यायाच्या प्रतीक्षेसाठी आई व मुलीचा मृतदेह मिठात पुरला; नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील घटना..!

खान्देश वार्ता-(धुळे)
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सरी गावाच्या शिवाराच्या घाटात महिलेचा मृतदेह झाडावर लटकलेला दिसला तर मुलाचा मृतदेह नदीत आढळल्याने मोलगी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान महिलेच्या माहेरच्यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाणे गाठले होते.

याबाबत नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात महिला आणि बालकाचे शवविच्छेदन केल्यानंतर सासरच्या मंडळींच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. महिलेच्या माहेरच्यांनी आई आणि मुलाचा मृतदेह दोन दिवसांपासून मिठात पुरून ठेवला आहे. या गुन्ह्याचा तपास करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आहेत. शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसातर्फे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलीस काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील सरीचा टेंबरी गव्हाणपाडा येथे राहणाऱ्या तिज्या इंद्या वसावे यांची मुलगी मोगीबाई चंदू पाडवी हीचे सुमारे १२ वर्षापूर्वी (साकली उमरचा लोहारपाडा, ता. अक्कलकुवा) येथील चंदू धन्या पाडवी याच्याशी लग्न झाले होते. चंदू पाडवी आणि मोगीबाई पाडवी यांना ५ वर्षाचा तनुष नावाचा मुलगा होता. तिज्या वसावे हे कुटुंबासमवेत शेतात काम करत असताना १३ ऑगस्ट रोजी सहा वाजेच्या सुमारास त्यांचा जावयाने सांगितले की, “मी नैसर्गीक विधीला सरी गावाच्या शिवारातील घाटात गेलो असता मला माझी पत्नी मोगी ही एका झाडाच्या फांदीस मृताअवस्थेत दिसून आली. मात्र मुलगा घरात अथवा महिलेजवळ आढळून आला नाही. अशी माहिती सांगितल्यानंतर तिज्या वसावे यांनी गावातील पोलीस पाटील तसेच नातेवाईकांना सोबत घेऊन जावयाने सांगितलेल्या ठिकाणी तपास करण्यासाठी निघाले.

ही बाब पोलीस पाटील यांनी पोलिसांनाही कळवले. मात्र रात्र झाल्याने काही दिसून आले नाही. त्यामुळे सर्व परत आले. दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पुन्हा सर्वजण त्या ठिकाणी गेले असता मोगी चंदू पाडवी (वय ३३) हीचा मृतदेह झाडाच्या फांदीस ओढणीने गळफास घेऊन ती लटलेल्या अवस्थेत दिसुन आली. तनुष चंदु पाडवी (वय ५) हा सुमारे ५०० मिटर अंतरावर नदीच्या पाण्यात मृत अवस्थेत दिसला.

शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालय मोलगी येथे मृतदेह नेण्यात आले. मात्र मृत महिलेल्या माहेरच्या मंडळींनी तिने आत्महत्या केली नसून घातपाताचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी मोलगी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. अखेर आई आणि बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. १४ ऑगस्ट रोजी शवविच्छेदन करून मृतदेह सासरच्या मंडळींच्या ताब्यात देण्यात आला.

मोगी चंदू पाडवी हीचा मृतदेह झाडाच्या फांदीस ओढणीने गळफास घेऊन ती लटलेल्या अवस्थेत दिसून आली. तर बालक तनुष चंदू पाडवी हा सदर ठिकाणाहून सुमारे ५०० मिटर अंतरावर नदीत मृत अवस्थेत दिसून आला. सदर महिलेने आत्महत्या केली नसून घातपाताचा संशय मृत महिलेच्या माहेरच्यांनी केला असून याबाबत आम्ही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मोलगी पोलीस ठाण्यात गेलो.

मात्र, आमचे ऐकले गेले नाही आणि शवविच्छेदनासाठी नंदुरबार येथे पाठवण्यात आले. आम्हाला न्याय हवा आहे. याघटनेत जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे असे मृत महिलेचे काका धिरसिंग रामा वसावे यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृत महिलेचे सासर असलेल्या साकली उमरचा लोहारपाडा येथे आई आणि बालकाचा मृतदेह दोन दिवसांपासून मिठात पुरून ठेवला आहे.

मोलगी पोलीस ठाण्यात सदर महिला व बालकाच्या मृत्यू प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढे योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी सांगितले. याबाबत पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × three =

Back to top button