देऊर खुर्द चे सरपंच अखेर पायउतार; जिल्हाधिकारी यांनी फेटाळला विवाद अर्ज
खान्देश वार्ता-(धुळे)
धुळे तालुक्यातील देऊर खु. येथील सरपंच सुदाम देसले यांचे विरुद्ध ग्रामपंचायत सदस्या सौ. पूनम गणेश देसले व इतर सदस्यांनी तहसीलदार धुळे ग्रामीण यांचेकडे अविश्वास नोटीस दिल्याने दि. ७/३/२०२४ रोजी अविश्वास ठराव पारित करण्यात आला होता.
सदर ठरावा विरुद्ध सरपंच यांनी जिल्हाधिकारी धुळे यांचेकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३५( ए)(बी) प्रमाणे विवाद अर्ज क्र. १०/२०२४ चा दाखल करून दाद मागितली होती. सदर कामी जिल्हाधिकारी यांनी ठरावास स्थगिती नाकारल्याने सरपंच यांनी ना. उच्च न्यायालयात धाव घेतली असता उच्च न्यायालयाने त्यांना स्थगिती दिली होती.
मात्र सदर कामी जिल्हाधिकारी यांचेकडे सुनावणी दरम्यान पुनम देसले यांच्या वतीने त्यांचे विधिज्ञ ॲड. वाल्मिक कचवे पाटील यांनी समर्पक व संयुक्तिक युक्तिवाद करून प्रखर बाजू मांडल्याने जिल्हाधिकारी यांनी दि.५/८/२०२४ रोजी सरपंच यांचा विवाद अर्ज फेटाळून त्यांना सरपंच पदावरून पायउतार केले याकामी ॲड. कचवे व त्यांचे जुनियर सहकारीॲड. सारंग जोशी यांनी काम पाहिले.