धुळेशैक्षणिक

राज्यस्तरीय अबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धेतील गुणवंताचा गौरव

खान्देश वार्ता-(धुळे)
नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय अबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धेत शहरातील १०० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या श्रेणीत यश संपादित केले.त्या गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव सोहळा आणि रिक्षा चालकांचा सन्मान सोहळा रवीवारी पार पडला.

शहरातील श्री समर्थ क्लासेस आणि नाशिक येथील येवले सनशाईन एज्युकेशन हब यांच्या संयुक्त विद्यमाने नकाने रोड परिसरात असलेल्या एकविरा रिसॉर्ट येथे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आणि रिक्षा चालकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. अध्यस्थानी जेष्ठ विधीतज्ञ वाय. एल.जाधव हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेनेचे पंकज गोरे,धुळे पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी व्ही.वाय. घुगे, युनियन बँकेचे व्यवस्थापक राहुल पाटील,श्री समर्थ क्लास च्या संचालिका अश्विनी पाटील, कविता पाटील, येवले सणशाईन एज्युकेशन हब चे जयेश येवले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. राज्यस्तरीय अबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धेतील 101 गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जयेश येवले यांनी केले.या वेळी पंकज गोरे, ऍड.वाय. एल.जाधव,व्ही.वाय.घुगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ऍड अमोल पाटील यांनी केले.

प्रोत्साहन ट्रॉफी ची भेट…
राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने कै.पंडितराव राघो पाटील यांच्या स्मरणार्थ संदीप पाटील यांच्या तर्फे सर्व विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह देऊन गौरविण्यात आले. एकाच वेळेस दोन सन्मान होत असल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − 16 =

Back to top button