क्राईमधुळे

बचावकार्य करतांना धुळे राज्य आपत्ती दलातील तीन जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू

खान्देश वार्ता-(धुळे)
प्रवरा नदीपात्रामध्ये बुडालेल्या मुलांचा शोध घेत असताना धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन जवानांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या जवानांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलात श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना सायंकाळी सोपवण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीच्या पात्रात मुले बुडाली होती. या मुलांच्या शोध आणि बचाव कार्य करण्यासाठी बुधवार दि.२२ मे रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या वतीने धुळे येथील आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आले होते.

IMG 20240523 183445

त्यानुसार धुळे येथील राज्य आपत्ती दलाची टीम क्रमांक दोन मधील दोन अधिकारी आणि २३ कर्मचारी बचाव कार्यासाठी रवाना करण्यात आले. ही टीम आज घटनास्थळी पोहोचली. त्यांनी गुरुवारी सकाळी शोध व बचाव कार्य सुरू केले. मात्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक बोट पाण्याच्या भोवऱ्यात अडकली. त्यामुळे बोट उलटली. या बोटीतील काही जवान पाण्यातून बाहेर येण्यात यशस्वी झाले. पण या घटनेमध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, पोलीस शिपाई वैभव सुनील वाघ व पोलीस शिपाई राहुल गोपीचंद पावरा हे तिन्ही जवान बुडाले. त्यांना तातडीने बाहेर काढून हरिश्चंद्र बावनकुळे रुग्णालय येथे दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले .या घटनेत मृत झालेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे तसेच पोलीस शिपाई वैभव सुनील वाघ आणि राहुल गोपीचंद पावरा अशी मयतांची नावे आहे.

यापैकी उप निरीक्षक प्रकाश शिंदे हे २० एप्रिल २००५ रोजी सेवेत रुजू झाले होते. त्यांचा मूळ घटक दौंड येथील गट क्रमांक पाच असून ते पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कोठडी येथील राहणारे आहेत. सध्या ते धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कॉर्टरमध्ये राहत होते. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी, दोन मुली असं परिवार आहे.

तर वैभव सुनील वाघ हे१ सप्टेंबर २०१४ रोजी सेवेत रुजू झाले होते .त्यांचा मूळ घटक मुंबई येथील गट क्रमांक पाच असून ते पांढरद ता. भडगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे .

तसेच पोलीस शिपाई राहुल गोपीचंद पावरा हे १ऑगस्ट २०१४ रोजी सेवेत रुजू झाले होते. ते धुळे येथील गट क्रमांक सहा येथील मूळ घटकातील असून ते धुळे येथीलच रहिवासी आहेत. धुळे येथील शंभर कॉर्टर्स मध्ये ते राहत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील ,पत्नी असा परिवार आहे. या सर्व शहीद जवानांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या परिसरात श्रद्धांजली अर्पण करून सायंकाळी सहा वाजता मृतदेह त्यांच्या परिवाराकडे सोपवण्यात आले.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × four =

Back to top button