शहादामध्ये व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार दिन साजरा
(रुपेश जाधव, खान्देश वार्ता)- नंदुरबार जिल्हा
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो स्वातंत्र्य पूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी तर स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासासाठी पत्रकारांनी केलेले कार्य अनमोल आहे. असे प्रतिपादन शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांनी केले
व्हाईस ऑफ मीडिया शहादा तालुका तर्फे हॉटेल अतिथी हॉल येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन व ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला बाळशास्त्री जांभेकर व सरस्वती प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार दीपक गिरासे होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, ज्येष्ठनेते डॉ. कांतीलाल टाटिया, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे, गटशिक्षण अधिकारी योगेश साळवे, माजी उपनगराध्यक्ष शेख जहीर शेख मुशीर, शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, जायंट्स फेडरेशनच्या अध्यक्ष एडवोकेट संगीता पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा सोनगिरे, इन्कलाब फाउंडेशनचे संदीप राजपाल, संकल्प ग्रुपचे राकेश कोचर, बीआरएस चे जिल्हा संघटक मनलेश जयस्वाल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी मान्यवराच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक दत्ता वाघ, प्रा. रवींद्र पंड्या, प्रा. डि सी पाटील, संजय राजपूत, लोटनराव धोबी, ईश्वर पाटील, के डी गिरासे, राजेंद्र अग्रवाल, अँड. सुधाकर पाटील, जगदीश अहिरे, भटेराम वाडीले, आर जी गिरासे, अजबसिंग गिरासे यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर कोरोना काळात सुमारे ७०० पेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे शहादा पालिकेचे स्मशानभूमीतील कर्मचारी प्रतापसिंह ठाकूर यांचा देखील शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पत्रकारांनी केलेल्या कार्याचा गौरव करीत बदलत्या पत्रकारितेवर भाष्य करत येणाऱ्या काळात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. पत्रकारांनी सकारात्मक भूमिका समाजासमोर मांडावी. अशी अपेक्षा व्यक्त करीत पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने भविष्यात पत्रकारांची जबाबदारी वाढणार आहे. पत्रकार समाजाला दिशा देण्यासोबत समाजातील चांगल्या वाईट घटकांचे प्रतिबिंब मांडत असल्याचे मनोगत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू जोंधळे यांनी करताना सांगितले की, पुढील वर्षापासून व्हाइस मीडियातर्फे वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष रुपेश जाधव, कार्याध्यक्ष बापू घोडराज सचिव हर्षल सोनवणे, विजय पाटील, विजय निकम, हिरालाल रोकडे, जिल्हा कोषाध्यक्ष विनय जैन, जगदीश जयस्वाल, ईश्वर पाटील, संतोष जव्हेरी, राजमल जैन, कैलास सोनवणे, नितीन साळवे, विजय पाटील, संजय मोहिते, जितेंद्र गिरासे, दिनेश पाटील, दिनेश पवार, योगराज इशी, रवींद्र गवळे, सुनील माळी, विनोद बोरसे, संजय जगताप, कल्पेश राजपूत, कृष्णा कोळी, प्रवीण देसले यांच्यासह संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन नरेंद्र गुरव यांनी केले. तर आभार व्हाईस ऑफ मीडिया शहादा तालुकाचे अध्यक्ष रुपेश जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील पत्रकार बांधवांसह विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.