धुळे जिल्हा परिषदेत भाजपेयींकडून ‘समर्पित राजकारण’ या उद्देशाला हरताळ..!
धुळे जिल्हा परिषदेत भाजपेयींकडून ‘समर्पित राजकारण’ या उद्देशाला हरताळ..!
(खान्देश वार्ता)-धुळे
‘वसुधैव कुंटुंम्बकम्’ या विचारधारेची ओळख पटवून देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ‘समर्पित राजकारण’ या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम धुळे जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. १३ महिन्यांच्या कार्यकाळासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ठरलेले असताना समर्पित राजकारण या उद्देशाला काळे फासत स्वकेंद्रीत राजकारणाचा परिपाठ घालून दिला जात आहे. पहिल्या अध्यक्षांनी अर्ध्यापेक्षा अधिक काळ अध्यक्षपद भाेगले.
यांनतर खांदेपालट झाले व विद्यमान अध्यक्षांनी मागच्या अध्यक्षांसाेबत वेगळा न्याय व आपल्या साेबत वेगळा न्याय, हे मान्य नाही म्हणत खूर्चिला चिटकून बसण्यात धन्यता मानली. महाजन, पटेल, रावल, भामरे, पावरा यानांच काय पण बावनकुळेंनाही फाट्यावर मारत न जुमानण्याचे धारिष्ठ्य दाखवले. शरद पाटलांसारखं आपल्याला काही आमदार हाेता येणार नाही आणि उराशी बाळगलेलं स्वप्न पू्र्ण हाेणार नाही. त्यात सुनेच्या नशिबातील राजयाेगाने राज्य मंत्री पदाचा दर्जा मिळाला. जणू काही आता निवडून येणार नाहीत आणि आलाेच तरी अध्यक्षपद काही मिळणार नाही, त्यामुळे रेटता येईल तेवढं रेटून न्यायचं.
पण या रेटण्यातून खदखद वाढत आहे. पक्षाविशयी जनमानसात चुकीचा संदेश जात आहे. आपल्यााल मिळालेल्या कालावधीत आपण स्वबळावर किती फंड आणला की हाणला, ताे का आणता आला नाही, जिल्हावासीयांचा फायदा झाला की स्वत:चा याचाही पदे भाेगणाऱ्या सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे. स्वकेंद्रीत राजकारण करत असताना पक्षाची साधनशूचिता, निष्ठा खुंटीला टांगल्यामुळे आपल्यामुळे आपल्या पक्षाला भविष्यात फटका बसेल याचा विचार मनाला न शिवणे याेग्य नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षातील धुरिण नेत्यांनी ही बाब गांर्भीयाने घेण्याची आवश्यकता आहे.
भाजपला जिल्हा परिषदेत माेठे बहुमत मिळाले. मात्र, अध्यक्ष पद साेडत नसल्यामुळे गट-तट पडले आहेत. भविष्यात याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकाराकडे वेळीच धुरिण नेत्यांनी लक्ष पुरविणे आवश्यक आहे. यामुळे पक्षाचाही प्रतिमा जनमानसात मलीन हाेत आहे.