MLA Rohit Pawar
खान्देश वार्ता-(चोपडा) आज तंत्रज्ञान वेगात वाढत असतांना भारतीय संस्कृती मात्र लोप पावत चालली आहे.अशा काळात भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम आमचे आदिवासी बांधव करीत आहे.अनेक दिवसांपासून भोंगऱ्या बाजाराला भेट देण्याची इच्छा होती तो योग आज जुळून आला आहे.असे मत आ.रोहित पवार यांनी चोपडा येथे बोलतांना केले चोपडा तालुक्यातील मालापुर येथील आदिवासी भोंगऱ्या उत्सवाचे उद्घाटन दि.१९ रोजी आ.रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी आदिवासी वेशभुषा परिधान केली होती.
यापूर्वी त्यांनी सकाळी पक्षाचे नेते अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानी भेट दिली. डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या जनसेवा हॉस्पिटल येथे युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आ.रोहित पवार यांनी युवकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर अरुणभाई गुजराथी, आ.सुनील भुसारा,जयवंत रानोळे, माजी शिक्षक आ.दिलीप सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील, चोसाका चेअरमन चंद्रहास गुजराथी, माजी चेअरमन ऍड.घनशाम पाटील, अतुल ठाकरे, अतुल पाटील, शशिकांत पाटील इंदिरा पाटील, जि.प.सदस्या नीलिमा पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ.चंद्रकांत बारेला यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणींचे निवेदन आ.रोहित पवार यांना दिले.