अन्य घडामोडीधुळे

मोदींच्या थापेबाजी ‘चे पितळ झाले उघडे..!

धुळ्यात मा.आ. अनिल गोटे यांची पत्रकार परिषदेत माहिती

खान्देश वार्ता-(धुळे)
देशातील जनतेने मोदींना अखेर नाकारलेच. केवळ दोन हजार मतांच्या फरकाने १६५ जागा मिळाल्या आहेत. तर ७९ जागा केवळ एक हजार मतांनीच जिंकल्या असल्याने आता मोदींच्या थापेबाजी चे पितळ उघडे झाले आहे. असे धुळे शहराचे मा.आमदार अनिल गोटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत भाजपाच्या विजयाची चीरफाड करीत माहिती दिली.

मा.आ. अनिल गोटे पुढे बोलतांना म्हणाले,’मोदी की गॅरंटी’ मोदींच्या या नौटंकीवर देशातील १४० कोटी जनतेने अविश्वास दाखवीला आहे. हाती आलेल्या आकडेवारी वरून भाजपाचे विदारक अंतरंग बाहेर आले आहे. भाजपाला मिळालेल्या २३९ जागांपैकी तब्बल १६५ जागा केवळ दोन हजार मतांच्या फरकाने आल्या आहेत. लोकसभेचा एक मतदार संघ १६ ते २४ लाख मतदारांचा असतो. लोकसभा मतदार संघातील मतांच्या संख्येवरून दोन हजार मते आगदी नगण्य आहेत यातील बहुतेक ठिकाणी मतांची हेराफेरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. २३९ मधून १६५ वजा केले तर, फक्त ७४ जागा शिल्लक राहतात. थोडे बारीक निरिक्षण केलयास सात जागा या केवळ २०० मतांच्या फरकाने तर २३ जागा ५०० मतांच्या फरकाने आल्या आहेत.

भाजपाच्या विजयाचे अंतरंग समजून घेतले पाहजे. याच्यापेक्षा जास्त लोक तर, आमच्या बाजार गावाच्या तुटक्या-मुटक्या एस.टी. बस मधून प्रवास करीत असतात. सर्वात धक्कादायक व आश्चर्यकारक वस्तुस्थिती अशी की, राम मंदिर, राम मंदिर म्हणून हिंदू मतदारांना देशभर साद घातली. पण मतांच्या संख्येत राम मंदिराचा परिणाम दिसून आला नाही. खुद्द अयोध्या (होशंगाबाद) लोकसभा मतदार संघात भाजपाला दारूण पराभव स्विकारावा लागला. २०१४ मध्ये ज्या उत्तर प्रदेशने ८० पैकी ७३ जागा जिंकून देण्याचा विक्रम घडविला त्याच राज्यात भाजपाला निम्या जागा राखता-राखता नाकी नउ आले. हिंदू-विरूध्द मुस्लीम, दलीत विरूध्द सवर्ण अशा जाती धर्माच्या विखारी प्रचाराचा दोन्ही धर्मातील मतदारांनी ठोकरून लावले आहे.

महाराष्ट्रात तर, मनोज जरांगे फॅक्टरने राम मंदिराच्या उभारणीमुळे अनुकूल वातावरण निर्माण होवूच दिले नाही. हे सत्य नाकारता येणे शक्य नाही. सदासर्वकाळ आपण फसवू शकतो ही देवेंद्र फडणविसांची घमेंड व माज मनोज जरांगे पाटलांनी व्यवस्थितपणे उतराला. धनगर, मराठे अशा समाजांना दाखविलेले गाजर समाजातील तरूण मतदारांनी योग्य ठिकाणी कधी व्यवस्थित फीट बसवले. देवेंद्र फडणवीसांनी देखील कळाले नाही. ‘You can’t tool all the people all the time’ हि इंग्रजीतील म्हण सत्यात उतरवून दाखविली. आपण निश्चित शोधले पाहिजे अशी माझी प्रामाणीक सूचना आहे. कांद्याचे आगार असणाऱ्या या भागातच शेतकऱ्यांमधील असंतोष मतांच्या पेटीत उतरत नसेल तर, भविष्यात होणार कसे ? असा यक्षप्रश्न उभा राहतो.

काही आकडेवारी यावेळी नमूद करण्यात आली. यात बिजगौर : भाजपा विजयी ९७१६५ मतांनी, समाजवादी पार्टी व राष्ट्रीय लोकदल ९५७२० मते, एम.आय.एम. २२९०, नागौर :- भाजपा १,०३,७७१ मतांनी विजयी तर समाजवादी पार्टी १०३६१६, एम.आय.एम. ३५९१, कुर्सी भाजपा विजयी १,१८,६१४, समाजवादी पार्टी १,१८,०९४, एम.आय.एम. ८५३३ व सुलतानपुर विजयी भाजपा ९२२४५ तर समाजवादी पार्टी ९०८५७, एम.आय.एम. ५२४०, औरी :- भाजपा ९३४३८, समाजवादी पार्टी ९१४२७, एम.आय.एम. २१८८, शहागंज भाजपा ७६०३५ समाजवादी ७०३७०, एम.आय.एम. ७०७०, फिरोजाबाद भाजपा ८४२२५, समाजवादी ७०९५७, एम.आय.एम. १६२९० या सर्व आकडेवादी वरून लक्षात येईल की, एम.आय.एम. ही भाजपाची ‘बी’ टीम आहे असे म्हणतात त्यात सत्य आहे.

यामुळे समस्त धुळे जिल्ह्यातील मतदारांना अतिशय कळकळीचे आवाहन आहे की, सर्वांनीच या विवेचनाच बारकाईने अभ्यास करावा. शेतकऱ्यांनी शपथच घेतली पाहीजे ‘जो किसानो की बात करेगा उसकोही हम वोट देंगे!’ माझे सर्वच शेतकरी भावांना माता भगिनींना आवाहन आहे की, निवडणुकीला पैसे लागतात हे खोटे आहे. निलेश लंकेनी सिध्द करून दिले आहे.

सुजय विखे पाटलांसारख्या लक्ष्मी पुत्राचा एका पत्र्याच्या शेड मध्ये राहतात प्रामाणीक, जनतेच्या प्रश्नाशी जिव्हाळा आहे. तेव्हा निवडणुकीला पैसा लागतो असे नाही. विकासाचा दृष्टीकोन नसेल, काम नसेल, तरच जात धर्म, आणि पैसा लागतो तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणीक असाल तर, तुमचा पराभव जगातील कुठलीही शक्ती करू शकत नाही असे अवाहनही मा. आ. अनिल गोटेनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.

 

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 5 =

Back to top button