क्राईमनंदुरबार

नंदुरबार शहरात बॅनर लावण्याचा वादातून युवकाच्या खून, पाच संशयित विरुद्ध गुन्हा दाखल

खान्देश वार्ता-(धुळे)
बॅनर लावण्याचा वादातून आठ दिवसापूर्वी तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. उपचारासाठी गंभीर जखमी युवकाला उपचारासाठी सुरत येथे नेण्यात आले होते. दरम्यान उपचारादरम्यान सोमवार दि.११रोजी रात्री युवकाची प्राणज्योत मालवली.

नंदुरबार येथील या घटनेनंतर युवकाच्या मृत्यूच्या बातमीनंतर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याजवळ मित्र परिवार मोठ्या संख्येने जमला होता. संशयीतांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी जमावाने केली. याप्रकरणी पाच संशयीतांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार शहरातील सिध्दीविनायक चौकात राहणाऱ्या मोहित मदन राजपूत व सुनिल ज्ञानेश्वर राठोड यांच्यात आठ दिवसापूर्वी बॅनर लावण्यावरुन वाद झाला होता. या वादातून शहरातील सिध्दीविनायक चौकात मोहित राजपूत याला लाथा बुक्क्यांनी जिवे ठार उद्देशाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत मोहित राजपूत याला गंभीर दुखापत झाल्याने. उपचारासाठी त्याला सुरत येथील रुग्णालयात नेण्यात आले होते.

रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी रात्रीच्या सुमारास मोहित राजपूत याची प्रकृत्ती खालावल्याने त्याची प्राणज्योत मालवली. नंदुरबार शहरात मोहित राजपूत यांच्या मृत्यूची वार्ता पसरल्यानंतर सिद्धिविनायक चौकात मित्रपरिवारने एकच गर्दी केली. त्यानंतर तो जमाव थेट नंदुरबार शहर पोलीस ठाण्यासमोर एकत्र आला. मोहित राजपूत याला मारहाण प्रकरणी संशयीतांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याप्रकरणी जयेश कन्हैय्यालाल राजपूत (रा.नवनाथनगर, नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सुनिल ज्ञानेश्वर राठोड, मुकेश उर्फ राणा राजपूत, संजय राजपूत उर्फ पप्पु तलवार, यशवर्धन लुळे उर्फ मुत्रा मराठे, अनिकेत तवर (सर्व रा. नंदुरबार)यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १०३, (१), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील करीत आहेत. मोहित राजपूत याचा मोठा मित्रपरिवार नंदुरबार शहरात आहे. मनमिळावू स्वभाव असल्याने घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + seven =

Back to top button